वैभव सूर्यवंशी आणि सुंदर पिचाई(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025 : आयपीएल २०२५ चे आतापर्यंत ३८ सामने खेळवण्यात आले आहेत. आयपीएल सामान्यांदरम्यान आशा बऱ्याच घटना घडत असतात की त्या एक वेगळाच प्रभाव पाडून जातात. अशीच एक घटना आता समोर आलिया आहे. इंडियन प्रिमिअर लीगच्या यंदाच्या हंगामात वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी वैभव सूर्यवंशी या तरुण खेळाडूने पदार्पण केलं आहे. त्याने राजस्थानकडून शनिवारी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्सदरम्यान पदार्पण केले. या सामन्यात संजू सॅमसनला दुखापतीमुळे बाहेर राहावं लागलं. त्याच्याजागी वैभला संघात स्थान देण्यात आले. तर राजस्थान रॉयल्सच्या कर्णधारपदाची धुरा रियान परागला देण्यात आली. या सामन्यात 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने मिळालेल्या संधीकह सोने केले. त्याने आयपीएलमधील पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. या त्याच्या खेळाची भुरळ भारतीय चाहतेच नाही तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना देखील पडली. त्या संदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केले आहे.
आयपीएलच्या आजवरच्या इतिहासामध्ये पदर्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार लगावण्याची कामगिरी करणारा वैभव सूर्यवंशी हा 10 वा खेळाडू ठरलाया आहे. वैभवने पदार्पणाच्या सामन्यात 20 चेंडूचा सामना करत तडाखेबंद 34 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने २ चौकार आणि ३ षटकार लगावले. सवाई मानसिंग स्टेडियमवर लखनौविरुद्ध खेळत असताना तो बाद झाल्यानंतर वैभवला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले होते. या सामन्यात एलएसजीने प्रथम फलंदाजी करत १८० धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात राजस्थान मात्र १७८ धावाच करू शकला. परिणामी पराभवाला समोरे जावे लागले.
Woke up to watch an 8th grader play in the IPL!!!! What a debut! https://t.co/KMR7TfnVmL
— Sundar Pichai (@sundarpichai) April 19, 2025
गुगलचे कार्यकारी अध्यक्ष सुंदर पिचाईसुद्धा वैभवची फलंदाजी पाहण्यासाठी अमेरिकी वेळेप्रमाणे सकाळीच उठून टीव्हीसमोर बसल्याचे त्यांनी स्वत: सांगितलं आहे. तसेच वैभवच्या खेळीचं कौतुक करण्यासाठी त्यांनी एक खास ट्विट देखील केले आहे.
हेही वाचा : BCCI कडून Central Contract जाहीर! ३४ खेळाडू झाले मालामाल, इशान किशनबाबत मोठी माहिती समोर..
पहिल्याच चेंडूंवर वैभव सूर्यवंशीने षटकार लगावाला होता. त्या षटकाराचा व्हिडिओ आयपीएलच्या एक्स हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आला. तो व्हिडीओ सुंदर पिचाई यांनी रिट्वीट केला आहे. ही पोस्ट करताना पिचाई यांनी लिहिले की, “सकाळी उठलो तेव्हा आठवीतल्या मुलाला आयपीएलमध्ये पदार्पण करताना पाहिलं. किती भारी पदार्पण आहे,” असे कॅप्शन लिहून त्यांनी वैभवचे कौतुक केले आहे.