Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: असिम मुजावरचा ‘पॉवर शो’! फॅन्टम क्रिकेट ॲकॅडमीने उंचावला मान्सून करंडक

Cricket News: विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या स्पेशलाईज्ड स्पोर्ट्स क्लबचा डाव १९.४ षटकांत १२३ धावांवर आटोपला. इशान माळीने ३० धावांची खेळी करत प्रतिकार केला. मात्र, फॅन्टमच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत विजयावर शिक्कामोर्तब केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 03, 2026 | 06:09 PM
पारितोषिक वितरण उत्साहात

पारितोषिक वितरण उत्साहात

Follow Us
Follow Us:
  • फॅन्टमने पटकावला ‘पुणे मान्सून करंडक’
  • असिम मुजावरच्या नाबाद ८५ रन्स 
  • स्पेशलाईज्ड स्पोर्ट्स क्लबवर ५३ धावांनी मात
पुणे: पुणे क्रिकेट ॲकॅडमी आणि सागर कांबळे यांच्या वतीने आयोजित ‘पुणे क्रिकेट मान्सून करंडक’ आंतरक्लब १४ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत फॅन्टम क्रिकेट ॲकॅडमीने विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात असिम मुजावर याने केलेल्या नाबाद ८५ धावांच्या शानदार खेळीच्या जोरावर फॅन्टम क्रिकेट ॲकॅडमीने स्पेशलाईज्ड स्पोर्ट्स क्लबचा ५३ धावांनी पराभव केला.

सातारा रोड येथील टेंभेकर फार्म्सच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात फॅन्टम क्रिकेट ॲकॅडमीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, संघाची सुरुवात अडखळती झाली. ठराविक अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने १३ षटकांत फॅन्टमची अवस्था ६५ धावांत आठ गडी बाद अशी झाली होती.

Cricket News: पुण्यात उद्यापासून क्रिकेटचा थरार; ‘या’ करंडकासाठी तब्बल 20 संघ भिडणार

असिमची निर्णायक खेळी

अशा बिकट परिस्थितीत नवव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या असिम मुजावरने आक्रमक फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. त्याने अवघ्या ४२ चेंडूंत १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने नाबाद ८५ धावांची खेळी केली. त्याला तनिष्क जाधवने १० धावांची साथ दिली. या दोघांनी नवव्या गड्यासाठी ६४ चेंडूंत ८७ धावांची निर्णायक भागीदारी केली. त्यामुळे फॅन्टम संघाने २५ षटकांत ९ गडी गमावून १७६ धावांचे आव्हान उभे केले.

पारितोषिक वितरण उत्साहात

विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या स्पेशलाईज्ड स्पोर्ट्स क्लबचा डाव १९.४ षटकांत १२३ धावांवर आटोपला. इशान माळीने ३० धावांची खेळी करत प्रतिकार केला. मात्र, फॅन्टमच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. नकूल राठोड आणि राफेल विगेस यांनी प्रत्येकी तीन, तर तनिष्क जाधवने दोन गडी बाद केले.स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धा संचालक सागर कांबळे, स्पेशलाईज्ड संघाचे प्रशिक्षक सागर सांगळे, फॅन्टम संघाचे प्रशिक्षक अक्षय सालवे, शाम गोगल, सुजल मोरे आणि गोरख वाडकर यांच्या हस्ते झाले. विजेत्या फॅन्टम क्रिकेट ॲकॅडमी आणि उपविजेत्या स्पेशलाईज्ड स्पोर्ट्स क्लबला करंडक व पदके देऊन गौरविण्यात आले.

Pune: युवा खेळाडूंचा जलवा! DSP करंडक स्पर्धेत ढोले-पाटील अकादमीची विजयाची हॅट्रिक; ‘या’ संघाचा दारुण पराभव

 अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकाल

फॅन्टम क्रिकेट ॲकॅडमी : २५ षटकांत ९ गडी बाद १७६ धावा. असिम मुजावर नाबाद ८५ (४२ चेंडू, १० चौकार, ५ षटकार), असद पठाण १४, तनिष्क जाधव १०. आदेश राऊत २/३६, संचित शिंदे २/९. नवव्या गड्यासाठी असिम मुजावर व तनिष्क जाधव यांच्यात ६४ चेंडूंत ८७ धावांची भागीदारी.

स्पेशलाईज्ड स्पोर्ट्स क्लब : १९.४ षटकांत सर्वबाद १२३ धावा. इशान माळी ३०, स्टीफन शिरोडकर ११. नकूल राठोड ३/१३, राफेल विगेस ३/२५, तनिष्क जाधव २/१३.

💡

Frequently Asked Questions

  • Que: असिम मुजावरने किती रन्सची खेळी केली?

    Ans: असिम मुजावरने नाबाद 85 रन्सची खेळी केली.

  • Que: ‘पुणे मान्सून करंडक’ कोण जिंकले?

    Ans: ‘पुणे मान्सून करंडक’ फॅन्टम क्रिकेट ॲकॅडमीने जिंकला आहे.

Web Title: Phantom cricket academy win monsoon cricket league asim mujavar pune sprots tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • cricket news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

मैदानावरच मृत्यूने गाठलं! गोलकीपरसोबत भीषण टक्कर अन् Jesús de Miguel…; क्रीडविश्व हादरलं
1

मैदानावरच मृत्यूने गाठलं! गोलकीपरसोबत भीषण टक्कर अन् Jesús de Miguel…; क्रीडविश्व हादरलं

Cricket News: पुण्यात उद्यापासून क्रिकेटचा थरार; ‘या’ करंडकासाठी तब्बल 20 संघ भिडणार
2

Cricket News: पुण्यात उद्यापासून क्रिकेटचा थरार; ‘या’ करंडकासाठी तब्बल 20 संघ भिडणार

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?
3

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?

Pune: युवा खेळाडूंचा जलवा! DSP करंडक स्पर्धेत ढोले-पाटील अकादमीची विजयाची हॅट्रिक; ‘या’ संघाचा दारुण पराभव
4

Pune: युवा खेळाडूंचा जलवा! DSP करंडक स्पर्धेत ढोले-पाटील अकादमीची विजयाची हॅट्रिक; ‘या’ संघाचा दारुण पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.