Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: पुण्यात उद्यापासून क्रिकेटचा थरार; ‘या’ करंडकासाठी तब्बल 20 संघ भिडणार

Cricket News: स्पर्धेचे संचालक सागर कांबळे आणि नरेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेचे यंदा आठवे वर्ष असून, शहरातील क्रिकेटला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 02, 2026 | 09:45 PM
Cricket News: पुण्यात उद्यापासून क्रिकेटचा थरार; ‘या’ करंडकासाठी तब्बल 20 संघ भिडणार
Follow Us
Follow Us:
  • अभिषेक ठाकूर करंडक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू
  • रणजीपटूंसह नामवंत खेळाडूंचा मैदानात जलवा
  • विजेत्याला एक लाखांचे पारितोषिक
पुणे/Cricket News: अभिषेक ठाकूर यांच्या स्मरणार्थ आयोजित आठव्या ‘अभिषेक ठाकूर करंडक’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेला ३ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पुणे क्रिकेट ॲकॅडमी आणि सागर कांबळे यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या मैदानावर रंगणार आहे. या स्पर्धेत मुंबई, रत्नागिरी, पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच जिल्ह्यातील एकूण २० संघ सहभागी होणार असून, पुण्यातील आजी-माजी रणजीपटूंसह अनेक नामवंत खेळाडूंचा सहभाग हे स्पर्धेचे वैशिष्ट्य असणार आहे.

स्पर्धेचे संचालक सागर कांबळे आणि नरेंद्र ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पर्धेचे यंदा आठवे वर्ष असून, शहरातील क्रिकेटला प्रोत्साहन देणे आणि स्थानिक खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. यंदा स्पर्धेला संघांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, एकूण २० संघांनी सहभाग नोंदविला आहे. साखळी आणि बाद फेरी अशा स्वरूपात सामने खेळविण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी एकूण दोन लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.

Pune: युवा खेळाडूंचा जलवा! DSP करंडक स्पर्धेत ढोले-पाटील अकादमीची विजयाची हॅट्रिक; ‘या’ संघाचा दारुण पराभव

 विजेतेपदासाठी रंगणार चुरस

गतविजेता गेम चेंजर्स आणि उपविजेता व्ही-एड्ज यांच्यासह मुंडे स्पोर्ट्स (मुंबई), एडी स्पोर्ट्स (रत्नागिरी), नॉक-९९, एनबीसी, युनायटेड स्पोर्ट्स क्लब, एबी क्रिकेट क्लब, एमईएस क्लब, प्लॅटिनम क्रिकेट ॲकॅडमी, स्केल-अप अ आणि ब, ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स ॲकॅडमी, हेमंत पाटील ॲकॅडमी, मॅव्हरीक्स, शशी पाटील इलेव्हन, ऑल स्टार, ब्रेव्हहार्ट क्लब, गॅलॅक्सी ड्रीमर्स आणि यजमान पुणे क्रिकेट ॲकॅडमी हे संघ विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत.

खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळणार

स्पर्धेतील विजेत्या संघाला एक लाख रुपये आणि आकर्षक करंडक, तर उपविजेत्या संघाला ५० हजार रुपये आणि करंडक देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय वैयक्तिक कामगिरीसाठीही विविध पुरस्कारांची तरतूद करण्यात आली आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक आणि सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू अशा पुरस्कारांनी गुणवंत खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारासह ‘फायटर ऑफ द मॅच’ पुरस्कारही दिला जाणार आहे. त्यामुळे स्पर्धेत सांघिक विजेतेपदाबरोबरच वैयक्तिक कामगिरीसाठीही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

Cricket News: प्रियांश राठोडची फटकेबाजी, विहान बोकरियाचा विकेट्सचा चौकार; सीएनए अंतिम फेरीत

💡

Frequently Asked Questions

  • Que: ‘अभिषेक ठाकूर करंडक’ स्पर्धा कुठे होणार आहे?

    Ans: ‘अभिषेक ठाकूर करंडक’ क्रिकेट स्पर्धा येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोर्ट्स ॲकॅडमीच्या मैदानावर रंगणार आहे.

  • Que: या स्पर्धेत किती संघ सहभागी होणार आहेत?

    Ans: ‘अभिषेक ठाकूर करंडक’ स्पर्धेत तब्बल 20 संघ सहभागी होणार आहेत.

Web Title: Abhishek cricket league start 3 november 2026 20 team participate pune sports news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • cricket news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?
1

Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?

Pune: युवा खेळाडूंचा जलवा! DSP करंडक स्पर्धेत ढोले-पाटील अकादमीची विजयाची हॅट्रिक; ‘या’ संघाचा दारुण पराभव
2

Pune: युवा खेळाडूंचा जलवा! DSP करंडक स्पर्धेत ढोले-पाटील अकादमीची विजयाची हॅट्रिक; ‘या’ संघाचा दारुण पराभव

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक समोर
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनची झलक समोर

Naushad Khan Viral Video: वडिलांची शिकवण कामी आली! नौशाद खान यांच्या लेकाने मोडला ३५ वर्षांचा विक्रम
4

Naushad Khan Viral Video: वडिलांची शिकवण कामी आली! नौशाद खान यांच्या लेकाने मोडला ३५ वर्षांचा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.