संजू सॅमसनची वादळी खेळी
भारतीय संघाची फलंदाजी
वेस्ट इंडिजने प्रथम भारताला फलंदाजीसाठी आमंत्रण दिले होते. त्यानुसार भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने भारताची सुरूवात केली. अभिषेक शर्मा केवळ 20 रन्स करून आउट झाला. तर दुसऱ्या बाजूने संजू सॅमसनने भारताची बाजू सांभाळून धरली. त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. अभिषेक आउट झाल्यावर इशान किशन खेळण्यासाठी मैदानात आला. इशान किशनने देखील 43 रन्सची महत्वाची खेळी केली. शिवम दुबे केवळ 7 रन्स करून आउट झाला. संजू सॅमसन 82 रन्सची खेळी करून आउट झाला. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये कर्णधार श्रेयस अय्यर आणि तिलक वर्माने तूफान आक्रमक फलंदाजी करत भारतीय संघाला 200 च्या पार पोहोचवले .
IND Vs WI: फक्त एक ‘हा’ फटका अन् Ishan Kishan थेट…; आज भारत-विंडीजमध्ये दुसरा सामना
वेस्ट इंडिजची गोलंदाजी
कर्णधार शाई होपने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना पहिली विकेट घेण्यात लवकर यश प्राप्त झाले. रोस्टन चेस या गोलंदाजाने भारताच्या सर्वात आक्रमक फलंदाज असलेल्या अभिषेक शर्माला लवकर आउट केले. यामुळे भारतीय संघाला पहिला धक्का बसला. रोस्टन चेसनेच वेस्ट इंडिजला दुसरी विकेट पटकावून दिली.
भारताची संभाव्य प्लेइंग 11
अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, आशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, नमन धीर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मयंक यादव.
IND A vs AUS A: टीम इंडियाची फलंदाजी ढेपाळली! ऑस्ट्रेलियाने पुन्हा चारली धूळ; भारताचा दारुण पराभव
वेस्ट इंडिजची संभाव्य प्लेइंग 11
शाई होप (कर्णधार), कामिल पूरन, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, मॅथ्यू फोर्ड, रोस्टन चेस, अकेल होसेन, शामर स्प्रिंगर, शामर जोसेफ.






