फोटो सौजन्य - Chennai Super Kings
आयपीएल २०२६, चेन्नई सुपर किंग्स: आयपीएल सुरू व्हायला एक आठवडा शिल्लक असताना चेन्नई सुपर किंग्स संघानसाठी फ्रॅन्चायझीने एक ऐतिहासिक कार्यक्रम केला. चेन्नई सुपर किंग्स संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये, ज्यात सध्याचे आणि माजी खेळाडू उपस्थित होते. महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. धोनी हे चेन्नईमध्ये केवळ एक नाव नाही, तर सीएसकेच्या चाहत्यांच्या हृदयाचा ठोका आहे. त्याचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरामध्ये आहेत, त्याने त्याचे नाव जगभरामध्ये कमावले आहे.
धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. कार्यक्रमादरम्यान धोनीने एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पाऊल ठेवताच, संपूर्ण स्टेडियम त्याच्या नावाने दुमदुमले. धोनीला पाहून काही चाहते तर भावूकही झाले. १९ व्या हंगामाच्या सुरुवातीला, चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या घरच्या मैदानावर, एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर, ‘रोअर २०२६’ नावाचा एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी चेन्नई सुपर किंग्सचे माजी खेळाडू मैदानावर एकत्र दिसले.
चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये संघाचा सुपरस्टार महेंद्रसिंग धोनी स्टेडियममध्ये प्रवेश करताना दिसत आहे. या कार्यक्रमात माहीने मैदानावर पाऊल ठेवताच, संपूर्ण स्टेडियममध्ये त्याचे नाव दुमदुमले. व्हिडिओमध्ये, धोनीला पाहून एक महिला चाहती रडू लागली. इतर चाहतेही भावूक झालेले दिसले. या कार्यक्रमात धोनी आणि सुरेश रैना यांना पुन्हा एकत्र पाहून चाहते खूप आनंदित झाले होते.
Thala Dharisanam 🦁#Roar26 #WhistlePodu pic.twitter.com/RST5EpXKct — Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 22, 2026
आम्ही तुम्हाला सांगतो की, मॅथ्यू हेडन, मुरली विजय, पार्थिव पटेल, एस बद्रीनाथ, सुरेश रैना, अंबाती रायडू, ड्वेन ब्राव्हो, हरभजन सिंग, मुथय्या मुरलीधरन, शादाब जकाती, लक्ष्मीपती बालाजी आणि जोगिंदर शर्मा यांसारखे चेन्नई सुपर किंग्सचे माजी खेळाडू या कार्यक्रमात दिसले होते. यावेळी हुसेने चेन्नईचा सध्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या चेंडूवर एक जोरदार फटका मारला. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धोनी आणि इतर खेळाडू मजा-मस्ती करताना दिसत आहेत. यावेळी धोनी यष्टीरक्षण करताना दिसला आणि सर्व माजी फलंदाजांनी फलंदाजी करताना धमाल केली.






