फोटो सौजन्य - Jio Cinema सोशल मीडिया
संजू सॅमसनचा षटकार : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये झालेल्या चार सामान्यांच्या शेवटच्या मालिकेत भारताच्या फलंदाजांनी कमाल केली. भारताच्या दोन फलंदाजांनी शतक ठोकले आणि भारताच्या संघाला विजय मिळवून दिला. भारताचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसनने या मालिकेमध्ये दुसरे शतक ठोकले तर टिळक वर्माने त्याच्या करियरचे सलग दुसऱ्या सामन्यात दुसरे शतक ठोकले आहे. संजू सॅमसनने ५६ चेंडूंमध्ये १०९ धावा केल्या तर टिळक वर्माने ४७ चेंडूंमध्ये १२० धावा केल्या आहेत. यामध्ये संजू सॅमसनने ६ चौकार आणि ९ षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर टिळक वर्माने जे शतक ठोकले यामध्ये १० षटकार आणि ९ चौकारांचा समावेश होता. आता यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
10व्या षटकात ट्रिस्टन स्टब्सच्या पहिल्या दोन चेंडूंवर संजूने दोन षटकार ठोकले. डीप मिड-विकेटवर त्याने दुसरा षटकार मारला. ज्याने स्टेडियममध्ये उभ्या असलेल्या एका महिलेच्या चेहऱ्यावर लागला. त्यामुळे ती वेदनेने ओरडू लागली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहताना दिसत होते. तेव्हा कोणीतरी महिला चाहत्याला गालावर बर्फ लावायला सांगितले. आता त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर संजू सॅमसनने शॉट मारल्यानंतर माफीही मागितली.
Wishing a quick recovery for the injured fan! 🤕🤞
Keep watching the 4th #SAvIND T20I LIVE on #JioCinema, #Sports18 & #ColorsCineplex 👈#JioCinemaSports pic.twitter.com/KMtBnOa1Hj
— JioCinema (@JioCinema) November 15, 2024
आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात संजू सॅमसनने 107 धावांची खेळीही खेळली होती. आता चौथ्या T20 सामन्यात त्याने 109 धावा केल्या आहेत. T20 मध्ये एकाच संघाविरुद्ध दोन शतके झळकावणारा तो भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी कोणीही हे करू शकले नव्हते. चौथ्या T20 सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. संघाकडून टिळक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी शतके झळकावली. टिळक यांनी 120 धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने 36 धावांची खेळी केली. टिळक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी केली, जी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी आहे. या खेळाडूंमुळेच भारतीय संघाने 283 धावा केल्या.
भारताच्या संघाची मालिकेमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर संघाने कमालीची फलंदाजी आणि गोलंदाजी करून दाखवली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला त्याच्या घरच्या मैदानावर ३-१ असे मालिकेमध्ये पराभूत केले. पहिल्या सामान्यांपासून भारताच्या संघाने दबदबा दाखवला. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला पण दुसऱ्या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने विजय मिळवून मालिकेत बरोबरी केली. त्यानंतर टीम इंडियाने कमबॅक करत तिसरा आणि चौथ्या सामन्यात कमाल केली.