फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा कसोटी संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका खेळत आहे. या मालिकेला कालपासून सुरुवात झाली आहे, भारताच्या संघाने पहिल्या दोन सेशनमध्येच वेस्ट इंडिजच्या संघाला पहिल्या इंनिगमध्ये सर्वबाद केले. शुक्रवारी ग्रीन पार्क येथे होणाऱ्या भारत अ-अ मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्टार भारतीय खेळाडू अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, अर्शदीप आणि हर्षित राणा मालिका जिंकण्याचे ध्येय ठेवतील. कर्णधार श्रेयस आणि प्रियांश यांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतके झळकावली, ज्यामुळे भारत अ संघाला १७१ धावांनी मोठा विजय मिळाला.
आता, आशिया कपमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या चार खेळाडूंचा युवा संघात समावेश झाल्याने संघाचे मनोबल वाढेल. भारत अ संघातील खेळाडू श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, रवी बिश्नोई, रियान पराग, अर्शदीप आणि हर्षित राणा हे ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध चांगली कामगिरी करून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या निवडीसाठी आपला दावा सिद्ध करण्यास उत्सुक असतील.
PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव; ७ विकेट्सने चारली धूळ
त्यामुळे, भारत अ संघासाठी एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना महत्त्वाचा आहे. १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी दावा करण्यासाठी हे स्टार खेळाडू बॅट आणि बॉल दोन्हीने आपली उपस्थिती दाखवतील. दरम्यान, गुरुवारी पावसामुळे भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ संघांचे सराव सत्र पुढे ढकलण्यात आले.
अभिषेकही गुरुवारी सामील झाला. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात, कर्णधार श्रेयस अय्यर आणि सलामीवीर प्रियांशु आर्य यांच्या शतकांच्या जोरावर भारत अ संघाने विक्रमी ४१३ धावा केल्या, तर ऑस्ट्रेलिया अ संघ २४२ धावांवर गारद झाला.
भारताच्या संघामध्ये आताच आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानच्या संघाला पराभुत करुन नवव्यांदा आशिया कप जिंकला आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत कमालीची कामगिरी केली होती. भारताच्या संघ आता 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे, यावेळी भारताचे स्टार विराट कोहली आणि रोहित शर्मा हे देखील संघासाठी खेळताना दिसणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी आणि टी20 क्रिकेटमधून निवृती घेतली आहे.