
T20 World Cup 2026: ICC's big announcement! This team, which was sitting on the sidelines, has struck gold! They will take Bangladesh's place in the T20 World Cup.
Scotland selected instead of Bangladesh : टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतून बांगलादेश संघाने अधिकृत माघार घेतली आहे. त्यामुळे आता या टी-२० विश्वचषकात बांगलादेशच्या जागी स्कॉटलंड संघाचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. टी-२० विश्वचषकात बांगलादेशची जागा स्कॉटलंडने घेतली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बांगलादेशची जागा स्कॉटलंड संघ घेणार असल्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा : IND VS NZ 2nd T20l : ‘मी रोहित शर्माच्या पावलावर पाऊल…’, भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माचे मोठे विधान
बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून टी-२० विश्वचषकासाठी आपला संघ भारतात पाठवण्यास नकार देण्यात आला आहे. बीसीबीची इच्छा होती की आयसीसीने त्यांचे सामने भारतातून हलवावेत. सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशकडून आयसीसीला गट बदलण्याची विनंती देखील करण्यात आली होती. तथापि, आयसीसीने ही विनंती फेटाळाऊन लावली आणि दोन्ही पक्षांमध्ये कोणताही करार होऊ शकला नाही, परिणामी बांगलादेशने टी-२० विश्वचषकातून माघार घेतली आणि त्याच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे.
बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला गट क मध्ये स्थान देण्यात आले आहे. जिथे स्कॉटलंड ७ फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. दुसरा सामना ९ फेब्रुवारी रोजी इटलीविरुद्ध आणि तिसरा सामना १४ फेब्रुवारी रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला जाईल. स्कॉटलंडचे पहिले तीनही सामने कोलकाता येथ खेळवण्यात येतील. स्कॉटलंड १७ फेब्रुवारी रोजी नेपाळविरुद्ध शेवटचा गट सामना मुंबईत खेळणार आहे. खेळेल.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने काल आयसीसी वाद निवारण समितीला (डीआरसी) पत्र लिहून राष्ट्रीय पुरुष संघाच्या टी२० विश्वचषक सामने भारतात आयोजित करण्याच्या निर्णयाला मागे घेण्यात यावी अशी विनंती केली. तथापि, हे प्रकरण डीआरसीच्या अधिकारक्षेत्राबाहेर असल्याने अपील ऐकण्यात आले नाही. त्यानंतर, आयसीसीने आज अधिकृतपणे बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला समाविष्ट करण्याची घोषणा केली.
आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांनी बोर्डाला पत्र लिहून कळवले की, बांगलादेश क्रिकेट बोर्ड त्यांच्या निर्णयाचे पालन करत नसल्याने त्यांच्याकडे स्पर्धेसाठी दुसऱ्या संघाला आमंत्रित करण्याशिवाय पर्याय नाही. यानंतर, आयसीसीचे सीईओ संजोग गुप्ता यांनी स्कॉटलंडला अधिकृत पत्र पाठवून टी-२० विश्वचषकात सहभागी होण्याची विनंती देखील केली आहे.