इशान किशन आणि सूर्या(फोटो-सोशल मीडिया)
Suryakumar Yadav’s statement about his wife : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७ विकेट्सने पराभव केला. दुसरा सामना शुक्रवारी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर २०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे लक्ष्य इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांच्या अर्धशतकांच्या जोरावर १५.२ ओव्हरमध्येच गाठले. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात सुरकुमार यादवने नाबाद अर्धशतक झळकवले. याबाबत त्याने मोठा खुलासा केला आहे.
न्यूझीलंडने टॉस गमावून प्रथम फलंदाजी करत रचीन रवींद्रच्या ४४ धावा आणि कर्णधार मिचेल सँटनरच्या नाबाद ४७ धावांच्या जोरावर ६ गडी गामावत २०८ धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाची सुरवात चांगली नव्हती. अभिषेक शर्मा शून्य तर संजू ६ धावा करून बाद झाले. त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (नाबाद ८२) आणि इशान किशन (७६) यांच्या आक्रमक खेळीने संघाचा डाव सावरला आणि भारताला ७ विकेट्सने विजय मिळवून दिला. भारताने या विजयासह मालिकेतील दुसऱ्या टी२० सामन्यात विक्रमी २८ चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठले आणि न्यूझीलंडचा सात विकेट्सने पराभव केला.
हेही वाचा : DC vs RCB, WPL 2026: आज दिल्लीसाठी अस्तित्वाची लढाई! RCB चे असणार मोठे आव्हान
दरम्यान, या सामन्यात अजून एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादव याचे फॉर्ममध्ये परत येणे. तब्बल ४६८ दिवसांनंतर, सूर्याने टी२० क्रिकेटमध्ये अर्धशतक पूर्ण केले. सूर्याने ८२ धावांच्या खेळीसह संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका देखील बजावली. सूर्यासोबत, इशान किशनने ७६ धावा करत त्याला चांगली साथ दिली. दरम्यान, दुसऱ्या टी२० सामन्यातील विजयानंतर, सूर्यकुमार यादवने इशान किशनशी त्याच्या फॉर्ममध्ये परतण्याबद्दल चर्चा केली. बीसीसीआयकडून त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Fearless intent 💪
Clarity of mind 😇
Flawless execution 👌 Reflecting on a commanding partnership ft. Captain Surya Kumar Yadav & Ishan Kishan 🤝 – By @RajalArora #TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank | @surya_14kumar | @ishankishan51 https://t.co/UkajUNlFHG — BCCI (@BCCI) January 24, 2026
व्हिडिओमध्ये सूर्याने त्याच्या फॉर्मबद्दल बोलताना म्हटले की, “जेव्हा मी घरी जातो तेव्हा माझ्या घरी एक प्रशिक्षक बसून असतो. ज्यांच्याशी मी लग्न केले आहे. ती मला माझा वेळ घेण्यास सांगत राहते. तिने मला खूप जवळून पाहिले असून ती माझे मन देखील जाणते. म्हणून मी तिच्या सल्ल्याचे पालन केले आणि काळजीपूर्वक खेळलो, माझ्या डावात थोडा वेळ काढण्याचा विचार केला. मी गेल्या सामन्यात आणि या सामन्यात देखील असेच केले.”
कर्णधार सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की, “मी लोकांना सांगत होतो की मी नेटमध्ये चांगली फलंदाजी करत आहे, परंतु तो आत्मविश्वास तोपर्यंत येत नाही जोपर्यंत तुम्ही सामन्यांमध्ये धावा काढण्यात यशस्वी होत नाही. मला २-३ दिवस चांगली विश्रांती मिळाली, घरी गेलो आणि सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहिलो. गेल्या तीन आठवड्यांत मी चांगला सराव केला, त्यामुळे मी योग्य मानसिकतेत आलो.”






