भारताच्या संघाचे विजयानंतर काही खास क्षण. फोटो सौजन्य - BCCI/ICC सोशल मीडिया
भारतच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांनी टीम इंडियाच्या विजयानंतर मैदानातील स्टंप घेऊन दांडिया खेळताना दिसले. क्रिकेट चाहते रोहित आणि विराटला सोबत पाहताना पसंत करतात त्यांचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीम इंडियाचा वेगवान जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारताचा मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्तीला संघामध्ये स्थान देण्यात आले यामध्ये त्याने टीम इंडियासाठी अविश्वनीय कामगिरी करून भारताच्या संघाला जेतेपद मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.
भारताचं एकदिवसीय क्रिकेटमधील स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने कमालीची कामगिरी या स्पर्धेमध्ये सातत्याने केली आहे.
मोहम्मद शमीने संघासाठी प्रदीर्घ काळानंतर संघामध्ये पुनरागमन केले होते आणि त्याने चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात ५ विकेट्स घेऊन दमदार पुनरागमन केले. मागील बऱ्याच वर्षांपासून मोहम्मद शमी भारतीय संघासाठी खेळत आहे पण त्याची ही पाहिली आयसीसी ट्रॉफी आहे.
दुबईच्या मैदानावर बसून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने ट्रॉफीसोबतचे काही फोटो काढले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने दुसरे आयसीसी टायटल जिंकले आहे तर चौथी आयसीसी फायनल स्पर्धा खेळली आहे.
भारताचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजाने शेवटचा चौकार मारून टीम इंडियाला जेतेपद मिळवून दिले. तर केएल राहुलने त्याची कमालीची फलंदाजीचे आणि विकेटकिपिंग स्किल्स दाखवले आहे. सोशल मीडियावर राहुलचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.
भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने कालच्या सामान्यांमध्ये काही काळ भारताच्या संघाचा खेळ सांभाळला आणि टीम इंडिया विजयी झाल्यानंतर त्याने त्याची आयकॉनिक पोझ दिली आणि तो फोटो त्याने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.