
A major shake-up in Pakistan cricket! The PCB has removed Azhar Mahmood from his position as head coach of the Test team.
PCB’s head coach Azhar Mahmood receives a setback : पाकिस्तान क्रिकेटमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. पीसीबीने राष्ट्रीय कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक अझहर महमूद यांच्याशी करार संपण्याच्या तीन महिने आधी त्यांना सोडचिठ्ठी दिली आहे. अझहरचा करार मूळतः मार्च २०२६ पर्यंत चालणार होता, परंतु बोर्डाने त्यांना अकालीच पदावरून दूर केले.
एका विश्वासार्ह सूत्रानुसार, “अझहरचा करार मार्चमध्ये संपणार होता आणि पाकिस्तानचा पुढील कसोटी दौरा देखील त्याच सुमारास सुरू होणार होतो. त्यामुळे बोर्ड आता नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी आपली रणनीती तयार करू इच्छित आहे.” अझहर महमूद यांची मागील वर्षी कसोटी मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. त्यांचा बोर्डासोबत दोन वर्षांचा करार देखील होता. पीसीबीकडून आता कसोटी संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या सपोर्ट स्टाफमध्ये देखील बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
२०२५-२७ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानचा सहभाग मार्च २०२६ मध्ये बांगलादेश दौऱ्याने सुरू होणार आहे. त्यानंतर संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिज आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे. वर्षाच्या अखेरीस, पाकिस्तान अनुक्रमे नोव्हेंबर-डिसेंबर २०२६ आणि मार्च २०२७ मध्ये श्रीलंका आणि न्यूझीलंडचे यजमानपद भूषावणार आहे.
महिला मुख्य प्रशिक्षकाचा शोध सुरू
निवड प्रकरणांवरून मतभेद झाल्यामुळे २०२४ च्या सुरुवातीला पीसीबी आणि ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक जेसन गिलेस्पी दूर झाले होते. अगदी तेव्हापासून कसोटी संघाकडे आकिब जावेद आणि अझर महमूदसारखे अंतरिम प्रशिक्षक उपलब्ध आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषकानंतर मोहम्मद वसीमचा करार नूतनीकरण करण्यात आल्यामुळे पीसीबी महिला क्रिकेट संघासाठी नवीन मुख्य प्रशिक्षकाचा शोध घेणे सुरू आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघ २०२६ वर्षाची सुरुवात श्रीलंकेच्या दौऱ्याने करणार आहे. या दौऱ्यात पाकिस्तान संघ तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार असून पहिला सामना ७ जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा सामना ९ आणि ११ जानेवारी रोजी होईल. या मालिकेतील सर्व सामने दांबुला येथे खेळले जातील.