नोव्हेंबर 2024 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका (IND vs AUS 5 कसोटी सामन्यांची मालिका) खेळली जाणार आहे, ज्याचे संपूर्ण वेळापत्रक क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरला पर्थ येथे खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ट्रॉफी उंचावण्याकडे लक्ष देईल. अशा परिस्थितीत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक या लेखाद्वारे जाणून घेऊया.
IND विरुद्ध AUS यांच्यातील पाच सामान्यांचे वेळापत्रक
पहिली कसोटी : 22-26 नोव्हेंबर : पर्थ स्टेडियम, पर्थ
दुसरी कसोटी : 6-10 डिसेंबर : ॲडलेड ओव्हल, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी : 14-18 डिसेंबर : गाबा, ब्रिस्बेन
चौथी कसोटी : 26-30 डिसेंबर : मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
पाचवी कसोटी : 3-7 जानेवारी : सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी
भारत आणि ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS ) मधील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिका 2024 मध्ये चार नाही तर पाच सामने खेळवले जातील. 32 वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ पाच कसोटी सामने खेळणार आहेत. शेवटची पाच सामन्यांची कसोटी मालिका 1991-92 मध्ये खेळली गेली होती. त्यादरम्यान यजमान ऑस्ट्रेलियाने ही मालिका 4-1 अशी जिंकली होती. मालिकेतील सिडनी कसोटीत रवी शास्त्रीने द्विशतक झळकावले आणि पर्थमध्ये सचिन तेंडुलकरने 114 धावांची अप्रतिम खेळी केली.