WTC final: Along with the winner and runner-up of WTC 2025, 'these' teams will also be rich! Team India will also be showered with millions of dollars..
WTC final : ११ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामना सुरू होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया ही दोन संघ आमनेसामने असणार आहेत. हा सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट संघाने पहिले वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जेतेपद जिंकले आहे, तर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल च्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. दोन्ही वेळा भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यावेळी पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जेतेपद कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. रक्षण करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे, टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका आयसीसी जेतेपदासाठी मैदानावर दोन हात करणार आहे.
यावेळी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ११ जून ते १५ जून दरम्यान लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे. विजेत्या संघाला ३.६ दशलक्ष डॉलर्सची बक्षिसाची रक्कम मिळणार आहे. ही रक्कम २०२१ च्या विजेत्या न्यूझीलंड आणि २०२३ च्या विजेत्या ऑस्ट्रेलियाला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेच्या दुप्पट आहे. तर उपविजेत्या संघाला २.१६ दशलक्ष डॉलर्स इतकी रक्कम मिळेल. याचा अर्थ असा की यावेळी उपविजेत्या संघाला गेल्या दोन विजेत्यांना मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे. २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि २०२१ मध्ये न्यूझीलंडला WTC विजेतेपद जिंकल्याबद्दल १.६ दशलक्ष डॉलर्स मिळाले होते.
२०२५ च्या आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदच्या अंतिम सामन्यात पोहोचू शकला नाही तरी देखील भारतीय क्रिकेट संघावर पैशांचा वर्षाव होणार आहे. यावेळी भारताला २०२१ आणि २०२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप चॅम्पियन संघांना मिळालेल्या बक्षीस रकमे इतकीच बक्षीस रक्कम मिळणार आहे. आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची बक्षीस रक्कम जवळजवळ दुप्पट केली आहे.
दोन्ही वेळा भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचून देखील पराभूत झाला होता. भारताला $८००,००० ची बक्षीस रक्कम मिळाली होती. अंतिम फेरीत न जाणाऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भारतीय संघाला $१.४४ दशलक्ष (अंदाजे ₹१२.३२ कोटी) मिळणार आहे. गेल्या दोन अंतिम फेरीत उपविजेते राहिलेल्या भारताला फक्त $८००,००० इतकी रक्कम मिळाली होती.
हेही वाचा : SA vs AUS : World Test Championship च्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग-११ ची घोषणा..
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिशेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड.