साऊथ आफ्रिका संघ(फोटो-सोशल मीडिया)
WTC Final : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना ११ जूनपासून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी मंगळवारी दक्षिण आफ्रिका संघाने जेतेपदाच्या सामन्यासाठी आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये वियान आणि ट्रिस्टन स्टब्स यांनास्थान देण्यात आले आहे. त्याच वेळी, रायन रिकेल्टन देखील या महान सामन्यासाठी संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे.
वेगवान गोलंदाजीमध्ये कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांना संघात स्थान मिळाले आहे. त्याच वेळी, मार्को जॅन्सन अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. केशव महाराज दक्षिण आफ्रिकेच्या संघात फिरकीची जबाबदारी सांभाळणार आहे.
मंगळवार, १० जून रोजी दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२५ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या फायनल सामन्यामध्ये आपला प्लेइंग इलेव्हन घपक्षित केला आहे. या दरम्यान, टेम्बा बावुमा आणि एडेन मार्करान हे संघासाठी सलामीवीराच्या भूमिकेत दिसतील. त्याच वेळी, रायन रिकेल्टन यष्टीमागे दिसणार आहे. जर मधल्या फळीबद्दल सांगायचे झाल्यास, ही जबाबदारी वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स आणि डेव्हिड बेंडिंगहॅम यांच्याकडे देण्यात आली आहे. काइल व्हेरेन संघात दुसरा यष्टीरक्षक म्हणून खेळणार आहे.
The final leg to Lord’s has begun! 🏟️
From grit to glory, it’s all been leading to this final test of character.
Let’s bring home the Mace! 🏆🏏🇿🇦#WTC25 #WozaNawe #BePartOfIt #ProteasWTCFinal pic.twitter.com/JOZqhBrPGe
— Proteas Men (@ProteasMenCSA) May 7, 2025
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जेतेपदाच्या सामन्यामध्ये, दक्षिण आफ्रिका त्यांच्या तीन मुख्य गोलंदाजांसह मैदानात उतरणारआहे. यामध्ये, कागिसो रबाडा वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दुसरीकडे, मार्को जॅन्सेन आणि लुंगी एनगिडी ही देखील रबाडासोबत गती राखताना दिसतील. तर फिरकीची जबाबदारी केशव महाराजच्या खांद्यावर असणारआहे.
South Africa announces its Playing XI for the #WTCFinal
Temba Bavuma leads the Proteas as they gear up to face defending champion Australia from Wednesday at Lord’s.
DETAILS ▶️ https://t.co/SAUvoQvQrm pic.twitter.com/bANAinKd7v
— Sportstar (@sportstarweb) June 10, 2025
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडेन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल व्हेरेन, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्स्टा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, कॅमेरॉन ग्रीन, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, जोश हेझलवुड, स्कॉट बोलँड, नॅथन लायन, मॅट कुहनेमन, ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह, ब्रेंडन डॉगेट.