Team India (Photo Credit-X)
Team India New Jersey Sponsor: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) नवीन टायटल स्पॉन्सरचा शोध अखेर संपला आहे. वृत्तानुसार, आता टीम इंडियाच्या जर्सीवर अपोलो टायर्स (Apollo Tyres) या कंपनीचे नाव झळकताना दिसेल. बीसीसीआय आणि अपोलो टायर्स यांच्यातील करार निश्चित झाला असून, कंपनी प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला ४.५ कोटी रुपये देणार आहे. ऑनलाइन गेमिंग विधेयक २०२५ सादर झाल्यानंतर, ड्रीम११ सोबतचा करार संपुष्टात आल्यामुळे बीसीसीआयला नव्या स्पॉन्सरचा शोध घ्यावा लागला होता.
🚨BREAKING🚨
Apollo Tyres will be India’s new jersey sponsor
The sponsorship deal, worth Rs. 579 crore, spans three years and covers 121 bilateral games and 21 ICC matches#IndianCricket #BCCI pic.twitter.com/36x8XYJoFg
— Cricbuzz (@cricbuzz) September 16, 2025
तुम्हाला सांगतो की २ सप्टेंबर रोजी बीसीसीआयने जर्सी प्रायोजकांसाठी बोली लावण्याचे नियम जारी केले होते. या नियमानुसार, गेमिंग, बेटिंग, क्रिप्टो आणि तंबाखू कंपन्या बोली लावू शकत नव्हत्या. याशिवाय, या यादीत इतर काही कंपन्यांची नावे देखील समाविष्ट करण्यात आली होती.
PCB ला आणखी एक झटका! आयसीसीने मॅच रेफरीला हटवण्याची मागणी फेटाळली; आता पाकिस्तान काय करणार?
ऑनलाइन गेमिंग विधेयक २०२५ सादर झाल्यानंतर बीसीसीआयला ड्रीम११ सोबतचा करार तात्काळ रद्द करावा लागला. या विधेयकात फॅन्टसी गेम्सना प्रोत्साहन देणाऱ्या ॲप्सवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती, ज्यात ड्रीम११ चे नाव देखील होते. ड्रीम११ आणि बीसीसीआयमध्ये २०२३ ते २०२६ या कालावधीसाठी ३५८ कोटी रुपयांचा करार झाला होता, मात्र नव्या कायद्यामुळे तो करार संपुष्टात आला. त्यामुळे आशिया कप २०२५ मध्ये टीम इंडिया स्पॉन्सरशिवाय खेळताना दिसत आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आशिया कप २०२५ मध्ये स्पॉन्सरशिवाय खेळत असली तरी, त्यांची कामगिरी मात्र दमदार आहे. भारतीय संघाने यूएईला ९ विकेट्सने हरवल्यानंतर, पाकिस्तानचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला. गोलंदाजीत कुलदीप यादवची जादू शिगेला पोहोचली आहे, तर अक्षर आणि वरुण यांनीही उत्तम लयीत काम केले आहे. फलंदाजीत अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना अक्षरशः जेरीस आणले आहे. सूर्यकुमार आशिया कपमध्ये पहिल्यांदाच टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे.