
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली नेपाळ क्रिकेट संघाचा माजी कर्णधार संदीप लामिछाने याला काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला आता पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
लामिछाने याने सोशल मीडियावर पोस्ट करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले होते. मात्र नंतर त्यांने आत्मसमर्पण करण्याचे मान्य केले. बलात्काराचा आरोप झाल्यानंतर संदीप नेपाळ सोडले होते पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यानंतर आपण आत्मसमर्पण करण्यास तयार असून ६ ऑक्टोबर रोजी देशात परतणार असल्याचे त्याने सांगितले.
Nepal | Former Nepali National team captain Sandeep Lamichhane, accused of raping a minor, arrested & taken into custody by police at Tribhuwan International Airport in Kathmandu https://t.co/IRkjcPPPvb pic.twitter.com/xF4f1LK0Ol — ANI (@ANI) October 6, 2022
आपल्या स्पष्टीकरणात लामिछाने यांनी फेसबुकवर लिहिले आहे, “मी मोठ्या आशेने आणि ताकदीने पुष्टी करतो की मी या ६ ऑक्टोबर २०२२ रोजी नेपाळला पोहोचत आहे. खोट्या आरोपांविरुद्ध कायदेशीर लढाई लढण्यासाठी मी नेपाळचा नागरिक म्हणून घोषित करतो. मी अधिकार्यांना सुपूर्द करीन. मी निर्दोष आहे आणि न्याय व्यवस्थेवर माझा अढळ विश्वास आहे याचा मी पुनरुच्चार करतो. माझा सर्व कायदा आणि सुव्यवस्थेवर विश्वास आहे. मला लवकरात लवकर न्याय मिळेल अशी आशा आहे.
कोण आहे संदीप लामिछाने?
संदीप लामिछानं नेपाळचा स्टार क्रिकेटपटू आहे. तो जगभरातील अनेक क्रिकेट लीगमध्ये खेळलेला नेपाळचा एकमेव खेळाडू आहे. आयपीएलमध्ये खेळणारा संदीप लामिछानं नेपाळचा पहिला क्रिकेटपटू आहे. याशिवाय तो ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीग, कॅरेबियन प्रीमिअर लीग आणि लंका प्रीमिअर लीगसह अनेक लीगमध्ये खेळत आहे.
विशेष म्हणजे संदीप लामिछानेनं १७ व्या वर्षीच आयपीएलचा पहिला सामना खेळला होता. दिल्लीच्या संघानं २०१८ मध्ये संदीप लामिछानला २० लाखात खरेदी केलं होतं. संदीपनं आयपीएलमध्ये आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. ज्यात १३ विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संदीपनं नेपाळसाठी ४४ टी-२०सामन्यात ८५ विकेट्स घेतल्या आहेत.