
Tilak Verma Century
Duleep Trophy 2026: सध्या दुलीप ट्रॉफी स्पर्धा 2026 सुरू आहे. या देशांतर्गत सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत अनेक रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. बंगळुरू येथे साऊथ झोन आणि नॉर्थ झोन यांच्यात सेमीफायनल सामना पार पडला. या सामन्यात साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्मा आहे. या कर्णधार तिलक वर्माने शानदार शतकी खेळी या सामन्यात केली आहे. कर्णधाराला साजेशी कामगिरी तिलक वर्माने केली आहे.
साऊथ झोन संघाचा कर्णधार तिलक वर्मा आणि श्रेयस गोपाळने शानदार खेळी करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे. नॉर्थ झोनच्या संघाने प्रथम फलंदाजी केली. प्रथम फलंदाजी करताना नॉर्थ झोनच्या संघाने 195 रन्स केल्या. त्यानंतर साऊथ झोनच्या संघाची फलंदाजीची सुरुवात खराब झाली.
दुलीप ट्रॉफी 2026 च्या सेमीफायनलमध्ये साऊथ झोन आणि नॉर्थ झोन हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. प्रथम फलंदाजी करताना नॉर्थ झोनच्या संघाने पहिल्यांदा 195 रन्स केल्या. यामध्ये कामरान इकबालने 76 रन्सची खेळी केली. त्याशिवाय कोणताही फलंदाजी 50 रन्सची खेळी करू शकला नाही. तर दिवस संपायच्या आतच साऊथ झोनने 9 विकेट्सवर 285 रन्स केल्या आहेत.
साऊथ झोनच्या सुरुवातीच्या फलंदाजांनी खास खेळी केली नाही. ते लवकर आउट झाले. त्यानंतर कर्णधार तिलक वर्माने शानदार शतक ठोकले आहे. त्याने 225 बॉल वर 106 रन्स केल्या आहेत. त्याने एकूण 7 फोर मारले आहेत. तो अद्याप नॉट आउट खेळत आहे. तर श्रेयस गोपाळने 169 बॉलवर 88 रन्सची खेळी केली आहे. मात्र तो शतकी खेळी करण्यापासून दूर राहिला.
तिलक वर्मा हा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळतो. म तर तो भारतीय टी 20 संघाचा नियमित खेळाडू आहे. लवकरच सप्टेंबर महिन्यात भारतीय संघ अफगणिस्तानविरुद्ध टी 20 सिरिज खेळणार आहे. या तीन सामन्यांच्या सिरिजमध्ये भारत आणि अफगणिस्तान भिडणार आहेत. या सिरिजसाठी 3 सप्टेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ खेळताना दिसणार आहे.
Duleep Trophy: वैभव सूर्यवंशीची जबरदस्त बॉलिंग, एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत दाखवली कमाल