
duleep trofi finals 2026
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी साऊथ झोनचा कर्णधार टिळक वर्मा याने अत्यंत संथ गतीने फलंदाजी केली. त्याच्या या बचावात्मक आणि धिम्या फलंदाजीमुळे चाहते काहीशी नाराजी पाहायला मिळाली. संघाला आक्रमक धावांची गरज असताना टिळक वर्माने घेतलेल्या अति-बचावात्मक भूमिकेमुळे सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
ईस्ट झोनने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांत उत्कृष्ट कामगिरी करत सामन्यात मोठे वर्चस्व राखले आहे. तिसऱ्या दिवसअखेर ईस्ट झोनची स्थिती अत्यंत मजबूत असून, चौथ्या दिवशी उर्वरित खेळ पूर्ण करत दुलीप ट्रॉफीचे विजेतेपद आपल्या नावे करण्यासाठी इशान किशनचा संघ सज्ज झाला आहे. त्यामुळे दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना ईस्ट झोन म्हणजेच कर्णधार ईशान किशनचा संघ जिंकण्याची शक्यता खूप जास्त दिसून येत आहे.
Duleep Trophy 2026: साऊथ झोनची झोप उडवली! Ishan Kishan 269 तर ईस्ट झोन 700 पार
साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्माने अत्यंत संथ फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. त्याने 133 बॉलमध्ये केवळ 56 रन्सची खेळी केली. यामध्ये त्याने केवळ 5 फोर मारले. पहिल्या डावात ईस्ट झोनने उभारलेल्या ७०० हून अधिक धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्मा याने अत्यंत संथ आणि बचावात्मक फलंदाजी केली.
ईस्ट झोन: अभिमन्यू इसवरन, वैभव सूर्यवंशी, कुमार कुशाग्रा, सुदीप कुमार घरामी, ईशान किशन (विकेटकीपर/कर्णधार), शिखर मोहन, अनुकुल रॉय, मोहम्मद कौनैन कुरेशी, मोहम्मद शामी, अभिजित के सरकार, मुकेश कुमार.
साऊथ झोन: रिकी भुई, नारायण जगदीसन (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शेख रशीद, तिलक वर्मा (कर्णधार), स्मरण रविचंद्रन, श्रेयस गोपाल, त्रिपुराना विजय, मोहम्मद सिराज, चामा व्ही मिलिंद, एमडी निधिश