फोटो सौजन्य – X
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सध्या पाच सामन्याची कसोटी मालिका सुरू आहे तर दुसरीकडे काउंटिंग क्रिकेटमध्ये अनेक भारताचे खेळाडू हे खेळताना दिसत आहेत. काउंटी क्रिकेटमध्ये युजवेंद्र चहल त्याचबरोबर तिलक वर्मा यासारखे खेळाडू आहे काउंटी क्रिकेटमध्ये खेळत आहेत. भारताचा युवा खेळाडू तिलक वर्मा याने काउंटी क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला आहे त्याने सलग दुसऱ्या शतक झळकावले आहे. तिलक वर्मा यांची इंग्लंडच्या भूमीवर अप्रतिम कामगिरी सुरूच आहे.
पहिल्या सामन्यात शतक आणि दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर, या युवा डावखुऱ्या फलंदाजाने तिसऱ्या सामन्यातही शतक झळकावले आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या तिलकने २५६ चेंडूंचा सामना करत ११२ धावांची संस्मरणीय खेळी केली. तिलकने आपल्या खेळीदरम्यान १३ चौकार आणि २ षटकार मारले. तिलकच्या या खेळीमुळे, हॅम्पशायरच्या संघाने तिसऱ्या दिवसाच्या खेळाच्या अखेरीस ६ गडी गमावून ३६७ धावा केल्या आहेत.
Tilak Varma doing what he does best. The highlights of his classy century against Nottinghamshire pic.twitter.com/bjFDBo5zUB
— Rothesay County Championship (@CountyChamp) July 25, 2025
टी-२० मध्ये आपली क्षमता दाखवणारा तिलक आता पांढऱ्या जर्सीमध्येही चांगली कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रथम फलंदाजी करताना, नॉटिंगहॅमशायरने 8 गडी गमावून 578 धावा काढल्यानंतर आपला पहिला डाव घोषित केला. जेम्स वेदरली आणि मिडलटन यांनी हॅम्पशायरला चांगली सुरुवात दिली आणि पहिल्या गड्यासाठी 94 धावा जोडल्या. वेदरली आणि मिडलटन 52 धावा करून बाद झाले. निक गब्बिन्स चांगल्या सुरुवातीचा फायदा उचलू शकले नाहीत आणि त्यांना फक्त 23 धावा करता आल्या. त्यानंतर तिलक वर्मा क्रीजवर आला.
तेंदुलकर, कोहली आणि एमएस धोनी यांची कमाई ऐकून व्हाल चकीत! रवी शास्त्रींनी केला खुलासा
तिलकने येताच जबाबदारी घेतली आणि मैदानाच्या कोपऱ्यात एकामागून एक शक्तिशाली फटके मारले. डावखुऱ्या फलंदाजाने 256 चेंडूंचा सामना करत 112 धावा केल्या. एका टोकावरून विकेट पडूनही, तिलक हॅम्पशायरच्या डावावर ठाम राहिला आणि त्यांना 300 धावांचा टप्पा ओलांडून दिला. तिलकने त्याच्या डावात 13 चौकार आणि दोन उत्तुंग षटकार मारले. तिलक वर्मा काउंटी क्रिकेटमध्ये त्याच्या फलंदाजीने सतत प्रभावित करत आहे.
त्याने पहिल्याच सामन्यात शतक झळकावले. एसेक्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तिलकने २४१ चेंडूंचा सामना करत १०० धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. पहिल्या डावात त्याने ५६ आणि दुसऱ्या डावात ४७ धावा केल्या. तिलकने आतापर्यंत चार डावात एकूण ३१५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने दोन शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे.