Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हँडशेक वादावर ट्रॅव्हिस हेडचा खुलासा; म्हणाला, ‘Virat सोबत पॅच-अपची गरज…’

Travis Head on Virat Kohli Hanshake Row: आयपीएल २०२६ दरम्यान विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील हँडशेक वादावर ऑस्ट्रेलियन फलंदाजाने अखेर मौन सोडले आहे. त्याने त्याची पत्नी, जेसिका डेव्हिस, हिला सोशल मीडियावर मिळालेल्या अपमानाचाही उल्लेख केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 25, 2026 | 04:45 PM
हँडशेक वादावर ट्रॅव्हिस हेडचा खुलासा; म्हणाला, ‘Virat सोबत पॅच-अपची गरज…’
Follow Us
Follow Us:
  • विराट कोहलीसोबतच्या वादावर ट्रेविस हेडचे मोठे विधान
  • पत्नीला शिवीगाळ, कुटुंबावरही परिणाम
  • मतभेदांच्या सर्व अफवांना पूर्णविराम
आयपीएल २०२६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यानंतर विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यातील हँडशेक वाद चर्चेत आला होता. सामन्यानंतर, विराट कोहली ट्रॅव्हिस हेडशी हँडशेक न करता निघून गेल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामुळे सोशल मीडियावर या दोन खेळाडूंमधील त्यांच्या नात्याबद्दल अनेक दावे केले गेले. आता, ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज, ट्रॅव्हिस हेडने अनेक महिन्यांनंतर या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

FIH Youth Hockey 5s : भारताचा हॉकीमध्ये पाकिस्तानवर ‘स्ट्राईक’; मोठ्या फरकाने मिळवत कायम ठेवली विजयी मालिका

‘विराटसोबत पॅच अॅपची गरज नाही’

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेडने स्पष्ट केले की, विराट कोहलीसोबतचे त्याचे संबंध सामान्य आहेत. हेड म्हणाला की,’मला वाटत नाही की आमच्यात काही मिटवण्याची ( Patch Up )गरज आहे. जे काही घडले ते खेळाचाच एक भाग होते. ज्या प्रकारे सामना झाला आणि जे घडले, त्याचे मला आश्चर्य वाटले नाही.’ हेडच्या या वक्तव्यामुळे दोन्ही खेळाडूंमधील मतभेदांच्या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

पत्नीला शिवीगाळ, कुटुंबावरही परिणाम

हँडशेकच्या वादानंतर, ट्रॅव्हिस हेडची पत्नी जेसिका डेव्हिसने खुलासा केला की तिला सोशल मीडियावर अपमानास्पद मेसेज आणि शिवीगाळ करण्यात आली होती. हेडने मान्य केले की या संपूर्ण घटनेचा परिणाम फक्त त्याच्यावरच नव्हे तर त्याच्या कुटुंबावरही झाला. तो म्हणाला की, ‘जेसिका आणि मी या गोष्टींकडे योग्य दृष्टिकोनातून पाहतो. हे आजचे जग आहे आणि ती ज्या प्रकारे अशा परिस्थिती हाताळते ते कौतुकास्पद आहे. कुटुंबातील इतर सदस्यांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला, त्यांना अशा गोष्टींची सवय नाही.’

ट्रॅव्हिस हेडने आपल्या पत्नीची प्रशंसा करत पुढे म्हटले की, तिने ही परिस्थिती मोठ्या संयमाने हाताळली. तो म्हणाला, ‘ काही दिवसांनी लोक सर्व काही विसरून जातात. जेसिकाने हे अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले. ज्या लोकांना अशा प्रकारच्या परिस्थितीची सवय नसते, त्यांना या गोष्टी हाताळणे हे खरे आव्हान असते.’

आरसीबी पुन्हा एकदा चॅम्पियन

आयपीएल २०२६ मध्ये, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने गुजरात टायटन्सला हरवून आपले सलग दुसरे विजेतेपद पटकावले.

IND vs ZIM: निर्णायक सामन्यात हरारेची खेळपट्टी कोणाला देणार साथ? पाहा Pitch Report आणि संभाव्य Playing 11

Web Title: Travis head virat kohli handshake row ipl 2026 statement wife trolling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • RCB vs SRH
  • Travis Head
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन? व्हायरल ट्विटमुळे गोंधळ; सत्य आलं समोर
1

जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाला Virat Kohli चे समर्थन? व्हायरल ट्विटमुळे गोंधळ; सत्य आलं समोर

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?
2

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य
3

‘…त्यांना सहजपणे बाहेर करता येणार नाही’; Virat Kohli- Rohit Sharma वर आर. अश्विनचे मोठे भाष्य

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !
4

Rohit Sharma – मी अजून संपलेलो नाही’अजून लढायचंय !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.