
फोटो सौजन्य - सोशल मिडिया
आशिया कप राइझिंग स्टार स्पर्धा पार पडली, यामध्ये भारताच्या संघाची सेमीफायनलमध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. बांग्लादेशविरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याआधी भारताच्या सिनियर संघाने एकही सामना न गमावता जेतेपद नावावर केले होते. आता भारताचा युवा संघ आशिया कप 2025 च्या मिशनवर जाणार आहे. १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
आयुष महात्रेवर विश्वास ठेवून निवडकर्त्यांनी त्याला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. विहान मल्होत्रा त्याचा उपकर्णधार असेल. तरुण स्टार खेळाडूंनी भरलेला हा संघ १२ डिसेंबर रोजी आपला पहिला सामना खेळणार आहे. युएईमध्ये खेळवण्यात येणारी ही स्पर्धा १२ डिसेंबरपासून सुरू होईल. आठ संघांना चार-चार अशा दोन गटात विभागण्यात आले आहे. दोन्ही गटामधील पहिल्या दोन स्थानावर असलेले संघ हे सेमीफायनलमध्ये प्रवेश करणार आहेत.
अंतिम सामना २१ डिसेंबर रोजी खेळवला जाईल. भारतीय १९ वर्षांखालील संघाला गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे आणि त्यांचा पहिला सामना १२ डिसेंबर रोजी खेळणार आहे. १९ वर्षांखालील भारतीय संघाची मागील काही महिन्यामध्ये चांगली कामगिरी राहिली आहे, आता हा संघ आशिया कपसाठी सज्ज झाला आहे. यासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिपाठी आणि अभिज्ञान कुंडू यांचाही संघात समावेश आहे. युवराज गोहिल आणि कनिष्क चौहान मधल्या फळीची धुरा सांभाळताना दिसतील.
🚨 NEWS 🚨 India’s U19 Squad for ACC Men’s U19 Asia Cup announced. The Junior Cricket Committee has picked the India U19 squad for the upcoming ACC Men’s U19 Asia Cup to take place in Dubai from 12th December. Details 🔽 https://t.co/NQS4ihS8hn — BCCI (@BCCI) November 28, 2025
१२ डिसेंबर – भारत विरुद्ध टीम क्वालिफायर १
१४ डिसेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
१६ डिसेंबर – भारत विरुद्ध टीम क्वालिफायर ३
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा (उप-कर्णधार), वेदांत त्रिपाठी, अभिज्ञान कुंडू, हरवेश सिंग, युवराज गोहिल, कनिष्क चौहान, खिलन पटेल, नमन पुष्पक, डी. दिपेश, हेनिल पटेल, किशन कुमार सिंग, जॉर्ज कुमार सिंग (उपकर्णधार), वेदांत कुमार सिंग (अभिज्ञान)
स्टँडबाय – राहुल कुमार, हेमचूदेश जे, बी.के. किशोर, आदित्य रावत