Robin Uthappa
मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर कोचिंग स्टाफमधील बदलाची घोषणा केली आहे. मुंबईने रॉबिन उथप्पाची नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली आहे.कायरन पोलार्ड यापूर्वी एमआयचे फलंदाजी प्रशिक्षक होते, परंतु त्यांना मुख्य प्रशिक्षकपदी बढती देण्यात आली. त्यामुळे, मुंबई इंडियन्सला पोलार्डच्या क्षमतेच्या अनुभवी प्रशिक्षकाची गरज होती. म्हणूनच त्यांनी उथप्पाकडे ही जबाबबजारी सोपवली आहे.
मुंबई इंडियन्सने नुकतेच लसिथ मलिंगा आणि पारस म्हाम्ब्रे यांचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपल्याची घोषणा केली आहे. तर दुसरकीडे मिचेल मॅकक्लेनघन यांची नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मिचेलला आयपीएल आणि वानखेडे स्टेडियमवर खेळण्याचा दांडगा अनुभव असून तो संघाच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक राहिला आहे. त्यामुळे, एमआयच्या कोचिंग स्टाफमध्ये हा एक महत्त्वपूर्ण बदल असेल. तसेच, धवल कुलकर्णी यांची डेव्हलेपमेन्टल गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
View this post on Instagram
भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप देखील मुंबई इंडियन्स संघात सामील झाले आहेत. भारताच्या तीन आयसीसी ट्रॉफी विजयांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता ते मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. टी. दिलीप हे एक अत्यंत यशस्वी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःला सिद्ध केले आहे. आता ते फ्रँचायझी क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्ससाठीही तशीच कामगिरी करून दाखवण्याचा प्रयत्न करतील.
मुंबई इंडियन्सच्या फक्त कोचिंग स्टाफमध्येच नाही तर, संघातही काही बदल होण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२६ संपल्यापासून, हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडू शकतो, अशा चर्चांनी जोर धरला आहे. वृत्तानुसार, पांड्याच्या ट्रेडबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो.
Ans: रॉबिन उथप्पाची मुंबई इंडियन्सच्या नवीन फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
Ans: मिचेल मॅक्लेनघन यांची नवीन गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे.
Ans: कायरन पोलार्ड यांची मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.






