
Ind vs Zim : महिला फॅन्ससाठी Good News; तीनही टी-20 सामन्या मिळणार मोफत प्रवेश
भारत आणि झिम्बॉब्वेच्या (Ind vs Zim) महिला संघांमध्ये रायपुरस्थित शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये टी-20 मालिकांचे तीन सामने खेळवले जाणार आहेत. आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साय यांच्या सल्लानुसार या तीनही सामन्यात महिला प्रेक्षकांसाठी मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.
दोन्ही देशांमध्ये 16, 18 आणि 20 ऑक्टोबरला टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत, ज्यानंतर वडोदरा येथे तीन सामन्यांची ODI सिरीज खेळवली जाईल.
छत्तीसगड राज्य क्रिकेट असोसिएशन (सीएससीएस) च्या एका सुत्राने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, असोसिएशनचे पदाधिकारी जेव्हा आमंत्रण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलो होते, तेव्हा त्यांनी आम्हाला हा सल्ला दिला. मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याला नाकारता येत नाही, त्यामुळे त्यानुसार असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.
IND vs WI: पाचव्या टी-२० मध्ये पावसाचा खेळखंडोबा? विजयाचं स्वप्न भंगणार? बंगळुरूमध्ये वादळाचा अलर्ट
सुत्र पुढे म्हणाले की, सध्या नवरात्री सुरू आहे. टी-20 सामन्यात जास्तीत जास्त महिला प्रेक्षक येण्याने रायपुरमधील उत्सवाचे वातावरण आणखीन शानदार होईल. मुख्यमंत्र्यांना हे निमंत्रण सीएससीएसचे अध्यक्ष मोहन दास, संचालक विजय शाह, माजी अध्यक्ष मुकुल तिवारी, सचिव विन्तेश अग्रवाल, जी. एस. मूर्ती, विनय बजाज आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिले.
असोसिएशनने गुरुवारी आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर याबाबत घोषणा करताना महिला क्रिकेट चाहत्यांना अपिल केली की, जास्तीत जास्त संख्येत स्टेडियममध्ये या आणि भारतीय संघाला पाठींबा देण्यासाठी स्टेडियम भरून टाका.
क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! MS Dhoni 2027 चे आयपीएल खेळणार की नाही? CSK च्या उत्तराने चाहते…
या मालिकेसह स्मृती मंधाना भारताच्या पूर्णवेळ कर्णधाराच्या रुपात आपलं नवं करिअर सुरुवात करणार आहे. सोबतच झिम्बॉब्वेची भारतविरुद्ध ही पहिली द्विपक्षीय सिरीज आहे.
असे पहिल्यांदा होणार जेव्हा रायपुरमध्ये एखादी महिला आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. टी-20 मालिकेनंतर दोन्ही संघ 23 ते 28 ऑक्टोबरपर्यंत तीन सामन्यांच्या ODI मालिकेसाठी वडोदराला जातील.
Ans: रायपूरमध्ये प्रथमच महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे.
Ans: या मालिकेत स्मृती मंधाना भारताच्या पूर्णवेळ कर्णधाराच्या भूमिकेतून नेतृत्व करणार असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
Ans: रायपूर येथे होणाऱ्या तिन्ही टी-२० सामन्यांसाठी महिला प्रेक्षकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.