Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोण आहे उमा काशवी? WPL Auction मध्ये रचला इतिहास; 15 वर्षांच्या खेळाडूवर दिल्ली कॅपिटल्सचा विश्वास

Who Is Uma Kashvi Youngest players to auctioned in WPL: कर्नाटकची अष्टपैलू खेळाडू उमा काशवी ही डब्ल्यूपीएल २०२७ च्या लिलावात विकली गेलेली सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 29, 2026 | 02:28 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेटविश्वात नवा विक्रम
  • १५ वर्षांच्या उमाचा WPL मध्ये धमाका
  • दिल्ली कॅपिटल्सने लावला डाव
WPL 2026 Auction: महिला प्रीमियर लीग २०२७ (WPL Auction) चा लिलाव २८ ऑक्टोबर कोची येथे पार पडला. कर्नाटकची युवा अष्टपैलू खेळाडू उमा काशवीने महिला प्रीमियर लीग (WPL) २०२७ च्या लिलावात इतिहास रचला. १५ वर्षीय अष्टपैलू खेळाडू उमा काशवीला दिल्ली कॅपिटल्स (DC) संघानने आपल्या ताफ्यात सामील केले. दिल्लीने तिला १० लाख रुपयांमध्ये विकत घेतले. या करारामुळे ती डबल्यूपीएलच्या इतिहासात लिलावात विकली जाणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली आहे. उमाने अंशु नागरचा विक्रम मोडला आहे. अंशु नागरला देखील वयाच्या १५ व्या वर्षी महिला प्रीमियर लीगच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सनेच संघात घेतले होते.

ICC T20 रँकिंगमध्ये मोठा उलटफेर! Abhishek Sharma ने ईशान किशनला पछाडलं; बनला जगातील नंबर 1 फलंदाज

कोण आहे उमा काशवी?

उमा काशवी ही कर्नाटकची रहिवासी आहे. अवघ्या १५ वर्षांच्या वयात तिची भारताच्या महिला अंडर -१९ संघात निवड झाली. ती उजव्या हाताने फलंदाजी करते आणि ऑफ-स्पिन गोलंदाजीही करते.उमाने श्रीलंकेविरुद्ध अंडर -१९ संघात पदार्पण केले. उमाने आतापर्यंत दोन वनडे आणि तीन टी-२० सामने खेळले आहेत. तिने तीन टी-२० सामन्यांमध्ये ४ विकेट्स आणि दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये २ विकेट्स घेतले आहेत.उमा सध्या कर्नाटकच्या १९ वर्षांखालील संघाचा भाग आहे. उमाने वयाच्या अवघ्या १२ व्या ज्युनियर क्लब-स्तरीय आंतर-शालेय स्पर्धेत द्विशतक झळकावले होते. तिच्या प्रभावी कामगिरीमुळे , बांग्लादेश आणि नेपाळमध्ये होणाऱ्या २०२७ च्या आयसीसी अंडर -१९ महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवडीची ती एक प्रबळ दावेदार मानली जात आहे.

तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केली उत्कृष्ट कामगिरी

उमाने देशांतर्गत क्रिकेटमधील आपल्या कामगिरीने प्रभावित केले आहे. अलीकडेच, विदर्भविरुद्धच्या महिला अंडर-१९ टी२० ट्रॉफी सामन्यादरम्यान उमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सामन्यादरम्यान, काशवी सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना माकड तिच्या दिशेने धावत आला. यामुळे ती जमिनीवर पडली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, या सामन्यात उमाची मैदानावरची कामगिरीही तितकीच प्रभावी होती. कर्नाटक अंडर-१९ संघाने हा सामना ६ धावांनी जिंकला आणि उमाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. उमाने शानदार गोलंदाजी करत ४ षटचकांत फक्त १८ धावा देऊन ३ विकेट्स घेतले.

उमा वैभवपेक्षा फक्त १२ दिवसांनी मोठी आहे

उमाचा जन्म ९ एप्रिल २०११ रोजी झाला. ती आयपीएल लिलावात विकली गेलेली सर्वात तरुण खेळाडू वैभव सूर्यवंशीपेक्षा फक्त १२ दिवसांनी मोठी आहे. तर, वैभव हा आयपीएलच्या लिलावात विकला गेलेला सर्वात तरुण खेळाडू आहे. त्याचा जन्म २७ मार्च २०११ रोजी झाला.

ICC चा Haris rauf ला मोठा दणका! विल जॅक्सशी भिडणं पडलं महागात; मैदानात नेमकं काय घडलं?

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोण आहे उमा काशवी?

    Ans: १५ वर्षाची उमा काशवी ही कर्नाटकची ऑलराउंडर क्रिकेटपटू आहे.

  • Que: उमा काशवीला WPL 2027 च्या लिलावात कोणत्या संघाने विकत घेतले?

    Ans: दिल्ली कॅपिटल्सने उमा काशवीला १० लाख रुपयांना आपल्या संघात सामील केले.

  • Que: उमा काशवीने WPL मध्ये कोणता रेकॉर्ड केला?

    Ans: उमा काशवी ही महिला प्रीमियर लीगच्या लिलावात विकली गेलेली सर्वात तरुण खेळाडू ठरली.

  • Que:

    Ans:

Web Title: Uma kashvi wpl auction 2027 youngest player delhi capitals pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Delhi Capitals
  • Karnataka
  • WPL 2026
  • WPL 2026 auction

संबंधित बातम्या

BasketBall : डेंसो आयरिस आशियाची चॅम्पियन; अंतिम सामन्यात सिचुआनचा धुव्वा
1

BasketBall : डेंसो आयरिस आशियाची चॅम्पियन; अंतिम सामन्यात सिचुआनचा धुव्वा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.