Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Under-19 World Cup 2026 : भारतच ‘BOSS’! सलग तीन विजयांसह सुपर-6 मध्ये एंट्री; न्यूझीलंडचा 7 विकेट्सने उडवला धुव्वा 

आज आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकातील २४ व्या सामन्यात भारतीय १९ वर्षांखालील संघाने न्यूझीलंड १९ वर्षांखालील संघाचा ७ विकेट्सने पराभव करून सुपर-६ मध्ये प्रवेश केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 24, 2026 | 09:54 PM
Under-19 World Cup 2026: India is the 'BOSS'! Entry into Super-6 with three consecutive wins; New Zealand thrashed by 7 wickets.

Under-19 World Cup 2026: India is the 'BOSS'! Entry into Super-6 with three consecutive wins; New Zealand thrashed by 7 wickets.

Follow Us
Close
Follow Us:

India Under-19 vs New Zealand Under-19 : आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकातील २४ वा सामना भारतीय १९ वर्षांखालील आणि न्यूझीलंड १९ वर्षांखालील संघ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ७ विकेट्सने बाजी मारली. न्यूझीलंडविरुद्धच्या या विजयासह भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषकातील सलग तिसरा विजय नोंदवत सुपर-६ मध्ये प्रवेश केला आहे.

बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पावसामुळे टॉस उशिरा झाला होता.  ज्यामुळे प्रत्येकी १३ षटके कमी कारवाई लागली होती. टॉस जिंकल्यानंतर भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार आयुष म्हात्रेचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थकी ठरवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने सर्व विकेट्स गमावून १३५ धावा उभ्या केल्या.

हेही वाचा : तो आला रे! ‘माही मार रहा है’, ऐकायला तयार रहा! IPL 2026 साठी MS DHONI चा सराव सुरू; VIRAL VIDEO

प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने १० षटकांत पाच विकेट्स गमावल्या. आर्यन मान फक्त ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर ह्युगो बोघ टिकू शकला नाही आणि तो ४ धावांवर माघारी गेला.  त्यानंतर कर्णधार टॉम जोन्स २ धावा, स्नेहित रेड्डी १० धावा,  मार्को विल्यम्स १ धावांवर बाद झाला. त्यानंतर जेकब कॉटर आणि जसकरण संधू यांनी डाव सावरत ३७ धावांची भागीदारी रचली. जसकरणही १८ धावा करून बाद झाला. . त्यानंतर जेकब कॉटर २३ धावांवर माघारी गेला. सेल्विन संजयन २८ धावा, फ्लिन मोरे १ धावा, मेसन क्लार्क ४ धावांवर बाद झाले तर कॅलम सॅमसन एका टोकावर ३७ धावा काढून नाबाद राहिला. परिणामी न्यूझीलंड संघ १३५ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय अंडर-१९ संघाकडून अम्ब्रिसने सर्वाधिक ४ बळी घेतले. हेनिल पटेलने ३, खिलन पटेलने १, मोहम्मद अनान आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.

Innings Break! On the back of 4⃣/2⃣9⃣ from Ambrish R.S, India U19 restrict New Zealand U19 to 135 🙌 Over to our batters ⌛️ Scorecard ▶️ https://t.co/tsYh3Rm1eV #U19WorldCup pic.twitter.com/1H2Q7RDNGf — BCCI (@BCCI) January 24, 2026

हेही वाचा : T20 World Cup 2026 : बांगलादेशचे खिसे होणार रिकामे! T-20 विश्वचषकातून माघारीने गमवावे लागतील तब्बल ‘इतके’ कोटी; वाचा सविस्तर

भारतीय संघाने ७ विकेट्सने जिंकला सामना

छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. आरोन जॉर्ज ७ धावांवर माघारी गेला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी ७६ धावांची भागीदारी करत डाव सावरला. केली.  वैभव सूर्यवंशी  ४० धावा काढून बाद झाला. त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले. त्यानंतर आयुष म्हात्रेने ५३ धावांचे महत्वपूर्ण योगदान देऊन बाद झाला. त्याने आपल्या खेळी दरम्यान २ चौकार आणि ६ षटकार लगावले. त्यानंतर विहान मल्होत्राने १७ आणि वेदांत त्रिवेदीने १३ धावा करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडकडून मेसन क्लार्कने, जसकरणने आणि सेल्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

Web Title: Under 19 world cup 2026 india enters the super six stage with a 7 wicket victory against new zealand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • ICC U19 World Cup
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

U19 World Cup Points Table : 11 संघ सुपर 6 साठी तयार 1 जागा शिल्लक! पाकिस्तानला अखेर यश, बांगलादेश अडचणीत
1

U19 World Cup Points Table : 11 संघ सुपर 6 साठी तयार 1 जागा शिल्लक! पाकिस्तानला अखेर यश, बांगलादेश अडचणीत

IND vs NZ U19 : वैभव सूर्यवंशी या दिवशी खेळणार! जाणून घ्या प्लेइंग 11, हेड टू हेड आणि लाईव्ह स्ट्रीमिंग
2

IND vs NZ U19 : वैभव सूर्यवंशी या दिवशी खेळणार! जाणून घ्या प्लेइंग 11, हेड टू हेड आणि लाईव्ह स्ट्रीमिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.