Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…

Hockey: घुमनहेरा अकादमीने दिवसातील सर्वाधिक गोलचा धडाका लावत रिजनल डेव्हलपमेंट सेंटरचा ७-१ असा फडशा पाडला. बिल्सन भेंग्रा याने पहिल्याच मिनिटाला आरडीसीला आघाडी मिळवून दिली, मात्र त्यानंतर घुमनहेराने सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजविले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 05, 2026 | 03:28 PM
All-India Hockey Tournament

All-India Hockey Tournament

Follow Us
Follow Us:
  • मेजर ध्यानचंद कॉलेजचा टाटा ग्रासरूट्सला धक्का
  • सात गोलांच्या दणक्यात उपांत्यपूर्व फेरीत
  • गतविजेता राउंडग्लाससह आठ संघांची आगेकूच
पुणे/Hockey:  मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स कॉलेजने शानदार आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत गतवर्षीच्या उपविजेत्या ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूट्स हॉकीचा ७-२ असा धुव्वा उडवून १०व्या एसएनबीपी अखिल भारतीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला. शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे- (pune) बालेवाडी येथे शनिवारी झालेल्या सामन्यात मेजर ध्यानचंदने सुरुवातीपासूनच सामन्यात वर्चस्व राखले.

२०२२ आणि २०२३ मध्ये उपविजेतेपद मिळविणाऱ्या मेजर ध्यानचंदने गेल्या वर्षीच्या अंतिम फेरीतील ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूट्सविरुद्ध दमदार विजय नोंदविला. पूर्वार्धातच तीन गोल करत मेजर ध्यानचंदने सामन्यावर पकड मिळविली. शिवन यादवने आठव्या मिनिटाला खाते उघडले. शिवमने २५व्या मिनिटाला आघाडी दुप्पट केली, तर त्यानंतर अवघ्या एका मिनिटात सुनील पालने गोल करत मध्यांतराला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात प्रदीप यादवने दोन गोल केले. रोमित पाल आणि शिवम यांनी प्रत्येकी एक गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केले. ओडिशाकडून वॉरेन्स झाल्को आणि राबिन एक्का यांनी प्रत्येकी एक गोल केला.

Asian Games 2026 : ‘चक दे इंडिया’; अखेर पोरींनी करून दाखवलं, तब्बल 44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्ण जिंकले

एसएनबीपीने नाशिकला ४-० असे नमविले

यजमान एसएनबीपी अकादमीनेही हॉकी नाशिकचा ४-० असा सहज पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. प्रथम कुमारने दोन गोल केले, तर रणजोत सिंग आणि वीर कुमार यांनी प्रत्येकी एक गोल केला. २०२४ आणि २०२५ चे विजेते राउंडग्लास अकादमीनेही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. सलग तिसऱ्या विजेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या राउंडग्लासचा डिस्ट्रिक्ट लेव्हल स्पोर्ट्स स्कूल, गुजरातविरुद्धचा सामना प्रतिस्पर्धी संघाने न खेळल्याने राउंडग्लासला विजयी घोषित करण्यात आले.

गतविजेत्या आर्मी बॉईजची एसजीपीसीवर मात

२०२३ चे विजेते आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनीने एसजीपीसी, अमृतसरचा ४-२ असा पराभव केला. ओमकुमारने सातव्या मिनिटाला आर्मी बॉईजचे खाते उघडले; मात्र अमनदीप सिंगने बरोबरी साधली. त्यानंतर शिवम पटेलने ३९व्या आणि ५६व्या मिनिटाला दोन गोल करत आर्मी बॉईजला आघाडी मिळवून दिली. अंकुर कुमारने आणखी एक गोल केला. एसजीपीसीकडून प्रिन्सप्रीत सिंगने दुसरा गोल केला.

घुमनहेरा अकादमीने दिवसातील सर्वाधिक गोलचा धडाका लावत रिजनल डेव्हलपमेंट सेंटरचा ७-१ असा फडशा पाडला. बिल्सन भेंग्रा याने पहिल्याच मिनिटाला आरडीसीला आघाडी मिळवून दिली, मात्र त्यानंतर घुमनहेराने सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजविले. राहुल आणि आर्यन यांनी प्रत्येकी दोन गोल केले, तर कार्तिक, लक्षय कुमार आणि देव यांनी प्रत्येकी एक गोल करत मोठा विजय मिळविला.

आर. के. रॉय अकादमीने रिपब्लिकन स्पोर्ट्स क्लबचा ५-१ असा पराभव केला. विनय कुमारने शानदार हॅट्ट्रिक नोंदविली, तर कुलदीप टोपनोने दोन गोल केले. रिपब्लिकनकडून हेथोइबा चिंगशुबम याने एकमेव गोल केला. एसएआयएलने कोहिनूर हॉकी अकादमीला ४-० असे नमविले. असीम एडिसनने पाचव्या आणि ६०व्या मिनिटाला दोन गोल केले. कुणाल आणि सुमन यांनी प्रत्येकी एक गोल करत एसएआयएलचा विजय निश्चित केला. उपांत्यपूर्व फेरीत राउंडग्लास अकादमीसमोर जय गणेशचे आव्हान असेल. मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स कॉलेजची लढत घुमनहेरा अकादमीशी होईल. आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी यजमान एसएनबीपी अकादमीशी भिडणार असून एसएआयएलसमोर आर. के. रॉय अकादमीचे आव्हान असेल.

Asian Games 2026 : ‘गोल्डन फ्रायडे’, बॉक्सिंगमध्ये एकापाठोपाठ एक सुवर्ण पदक, अंकुश पंघालने रचला इतिहास

असे असतील उपांत्यपूर्व फेरीचे सामने
राउंडग्लास अकादमी विरुद्ध जय गणेश
मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स कॉलेज विरुद्ध घुमनहेरा अकादमी
आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी विरुद्ध एसएनबीपी अकादमी
एसएआयएल विरुद्ध आर. के. रॉय अकादमी

Web Title: Up merath major dhyanchand sports college beat odisha team in hockey sports pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Hockey
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Wrestling: शुभम शिरसाठ-ओमकार काकडची कुस्तीच्या आखाड्यात बाजी! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मिळवली पात्रता
1

Wrestling: शुभम शिरसाठ-ओमकार काकडची कुस्तीच्या आखाड्यात बाजी! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मिळवली पात्रता

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली
2

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली

Asian Games 2026 : ‘चक दे इंडिया’; अखेर पोरींनी करून दाखवलं, तब्बल 44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्ण जिंकले
3

Asian Games 2026 : ‘चक दे इंडिया’; अखेर पोरींनी करून दाखवलं, तब्बल 44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्ण जिंकले

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन
4

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.