Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिमानास्पद! अडचणी आल्या, पण जिद्द सोडली नाही; मीरा-भाईंदरच्या रेश्मा कुटे बनल्या पहिल्या महिला फुल आयर्नमॅन

Mira-Bhayandar: पोलीस दलातील जबाबदाऱ्या सांभाळत रेश्मा यांनी आतापर्यंत भारतासह परदेशात 75 हून अधिक मॅरेथॉन आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतील प्रतिष्ठित 'कॉम्रेड्स मॅरेथॉन'मध्ये त्यांनी कांस्यपदक पटकावले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 21, 2026 | 06:01 PM
व्हिएतनाममध्ये प्राप्त केला फुल आयर्नमॅनचा किताब

व्हिएतनाममध्ये प्राप्त केला फुल आयर्नमॅनचा किताब

Follow Us
Follow Us:
  • दुखापतीवर मात करत रेश्मा कुटे यांची ऐतिहासिक कामगिरी
  • व्हिएतनाममध्ये प्राप्त केला फुल आयर्नमॅनचा किताब
  • 3.8 किमी पोहणे, 180 किमी सायकलिंग आणि 42 किमी धावण्याचे आव्हान केले पूर्ण
Mira-Bhayandar: जिद्द, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मीरा-भाईंदरच्या रेश्मा कुटे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक यश संपादन केले आहे. व्हिएतनाम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत फुल आयर्नमॅनचा किताब पटकावत त्यांनी मीरा-भाईंदर शहरासह पोलीस दलाचा नावलौकिक वाढवला आहे. मीरा-भाईंदर शहर आणि मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील पहिल्या महिला फुल आयर्नमॅन होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

फुल आयर्नमॅन ही अत्यंत कठीण आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारी स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत रेश्मा कुटे यांनी निर्धारित वेळेत 3.8 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावणे अशी तीन आव्हाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. विशेष म्हणजे, स्पर्धेपूर्वी विमान कंपन्यांच्या नियमांमध्ये अचानक बदल झाल्यामुळे सरावासाठी वापरण्यात येणारी त्यांची सायकल मुंबई विमानतळावरच रोखण्यात आली. मात्र, या अडचणीसमोर हार न मानता त्यांनी व्हिएतनाममध्ये नवीन सायकल खरेदी केली. त्या सायकलमध्ये तांत्रिक अडचणी असूनही त्यांनी 180 किलोमीटरचे सायकलिंग यशस्वीपणे पूर्ण केले.रेश्मा यांचा हा यशस्वी प्रवास अनेक संघर्षांनी भरलेला आहे.

RATNAGIRI : १६ महिन्यांच्या आयरिशचा जलतरणात विक्रम; १०० मीटर अंतर १६ मिनिटांत केले पूर्ण

2011 मध्ये गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तब्बल सात वर्षे खेळापासून दूर राहावे लागले. त्यानंतर 2019 मध्ये शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांनी पुन्हा सराव सुरू केला. अवघ्या 10 किलोमीटर चालण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज 161 किलोमीटरच्या अल्ट्रा मॅरेथॉनपासून फुल आयर्नमॅनसारख्या अत्यंत कठीण स्पर्धेपर्यंत पोहोचला आहे.

पोलीस दलातील जबाबदाऱ्या सांभाळत रेश्मा यांनी आतापर्यंत भारतासह परदेशात 75 हून अधिक मॅरेथॉन आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेतील प्रतिष्ठित ‘कॉम्रेड्स मॅरेथॉन’मध्ये त्यांनी कांस्यपदक पटकावले होते. तसेच 161 किलोमीटरच्या खुल्या महिला गटात पहिल्या पाच धावपटूंमध्ये स्थान मिळवले होते.

मूळच्या जन्नर तालुक्यातील नेटवड गावच्या असलेल्या रेश्मा कुटे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संधीची वाट पाहण्यापेक्षा स्वतः संधी निर्माण करावी, तसेच सातत्यपूर्ण मेहनत, अनुभव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतेही ध्येय साध्य करता येते, असा संदेश त्यांच्या कामगिरीतून मिळतो. पोलीस दलातील कर्तव्य बजावत क्रीडा क्षेत्रात मिळवलेले हे यश महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण ठरले असून, त्यांच्या या कामगिरीमुळे शहरासह पोलीस दलाची मान अभिमानाने उंचावली आहे.

Mira Bhayandar मध्ये तीन दिवसांत चार आत्महत्यांच्या घटना; तीन विवाहित महिलांसह १६ वर्षीय मुलीचा मृत्यू

💡

Frequently Asked Questions

  • Que: रेश्मा कुटे यांनी फुल आयर्नमॅनचा किताब कोणत्या देशात पटकावला?

    Ans: मीरा-भाईंदरच्या रेश्मा कुटे यांनी व्हिएतनाम येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत फुल आयर्नमॅनचा किताब पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली.

  • Que: फुल आयर्नमॅन स्पर्धेत कोणती आव्हाने पूर्ण करावी लागतात?

    Ans: फुल आयर्नमॅन स्पर्धेत 3.8 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावणे अशी तीन अत्यंत कठीण आव्हाने निर्धारित वेळेत पूर्ण करावी लागतात.

Web Title: Mira bhayandar reshma kuthe first full iron man police swimming cyling sports tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • mira bhayandar
  • Police News
  • Sports News

संबंधित बातम्या

Cricket News: हरी सावंतने मारलं मैदान! 3 विकेट्स अन्…; PCMC करंडकवर ‘विन टेंपल’ने कोरले नाव
1

Cricket News: हरी सावंतने मारलं मैदान! 3 विकेट्स अन्…; PCMC करंडकवर ‘विन टेंपल’ने कोरले नाव

Marathon: ९० किलोमीटरचे आव्हान पेलले, आता शंभराव्या मॅरेथॉनची तयारी! धाराशिवच्या सुपुत्राची प्रेरणादायी कामगिरी
2

Marathon: ९० किलोमीटरचे आव्हान पेलले, आता शंभराव्या मॅरेथॉनची तयारी! धाराशिवच्या सुपुत्राची प्रेरणादायी कामगिरी

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट

Shrikant Shinde: ७५ हजार खेळाडू, ३२ खेळ आणि ऑलिम्पिकचा ध्यास; ठाण्यात खासदार क्रीडा संग्राम’चे उद्घाटन
4

Shrikant Shinde: ७५ हजार खेळाडू, ३२ खेळ आणि ऑलिम्पिकचा ध्यास; ठाण्यात खासदार क्रीडा संग्राम’चे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.