Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: हरी सावंतने मारलं मैदान! 3 विकेट्स अन्…; PCMC करंडकवर ‘विन टेंपल’ने कोरले नाव

Cricket News: हिंजेवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर पहिल्यांदा खेळणाऱ्या बजरंग दल संघाचा डाव १८.२ षटकात ८३ धावांवर संपुष्टात आला. सुशांत कांबळे (२३ धावा) आणि ओंकार यादव (१३ धावा) यांनी थोड्याफार धावा केल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 21, 2026 | 04:20 PM
आंतरक्लब खुला गट टी-२० क्रिकेट स्पर्धा

आंतरक्लब खुला गट टी-२० क्रिकेट स्पर्धा

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी चिंचवड करंडक‌ावर ‘विन टेंपल’ने काेरले नाव
  • आंतरक्लब खुला गट टी-२० क्रिकेट स्पर्धा
  • बजरंग दल संघाचा चार गडी राखून पराभव
Cricket News: पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित ‘पिंपरी चिंचवड करंडक‌’ आंतरक्लब खुल्या गटाच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत हरी सावंत याने केलेल्या अष्टपैलु कामगिरीच्या जोरावर विन टेंपल क्लबने बजरंग दल संघाचा (Sports) चार गडी राखून पराभव करत विजेतेपद संपादन केले.

हिंजेवाडी येथील फोर स्टार क्रिकेट मैदानावर पहिल्यांदा खेळणाऱ्या बजरंग दल संघाचा डाव १८.२ षटकात ८३ धावांवर संपुष्टात आला. सुशांत कांबळे (२३ धावा) आणि ओंकार यादव (१३ धावा) यांनी थोड्याफार धावा केल्या. विन टेंपल संघाच्या हरी सावंत याने १६ धावांत तीन गडी बाद केले. वेरून चोदरी यानेसुध्दा १८ धावांत तीन गडी बाद केले. राकेश जे. आणि रोहीत चौधरी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून बजरंग दलाचा डाव झटपट गुंडाळला. हे लक्ष्य विन टेंपल क्लबने १२.४ षटकात व ६ गडी गमावून पूर्ण केले. हरी सावंत याने नाबाद ४३ धावांची खेळी केली. याशिवाय ललित मुसळे (१९ धावा) आणि विहान बागड (१४ धावा) यांनीही धावांचे योगदान देऊन संघाचे विजेतेपद निश्चित केले.

IND vs NZ : राहुलचे शतक पूर्ण; भारतीय संघाची धावसंख्या 260 च्या पार

स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्राचे रणजीपटू आणि एमसीएचे माजी सचिव रियाज बागवान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीसीसीएचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल, खजिनदार संजय शिंदे, सहसचिव दिलीपसिंह मोहीतेपाटील, स्पर्धेचे संयोजक सुशील जाधव, मुकेश गुजराती, प्रशांत तेलंगे आदि उपस्थित होते. जगदीश शेट्टी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. राजू कोतवाल यांनी प्रास्ताविक तर, संजय शिंदे यांनी सुत्रसंचालन केले. मुकेश गुजराती यांनी सर्वांचे आभार मानले. विजेत्या विन टेंपल संघाला करंडक आणि २५ हजार रूपये, उपविजेत्या बजरंग दल संघाला करंडक आणि १५ हजार रूपये आणि तृतीय क्रमांकाच्या सह्यांद्री किंग्ज्‌ संघाला करंडक आणि पाच हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले.

अंतिम सामन्यांचा संक्षिप्त निकाल

बजरंग दलः १८.२ षटकात १० गडी बाद ८३ धावा (सुशांत कांबळे २३, ओंकार यादव १३, हरी सावंत ३-१६, वेरून चोदरी ३-१८, राकेश जे. २-३, रोहीत चौधरी २-१३) पराभूत वि. विन टेंपल क्लबः १२.४ षटकात ६ गडी बाद ८७ धावा (हरी सावंत नाबाद ४३ (३०, ५ चौकार, १ षटकार), ललित मुसळे १९, विहान बागड १४, गणेश कालेल ३-११); सामनावीरः हरी सावंत

IND vs PAK सामन्यात पुन्हा वाद! एकही चेंडू न खेळता पाकिस्तान बनला विजेता; भारताचा अवॉर्ड सेरेमनीवर बहिष्कार, नेमकं प्रकरण काय?

वैयक्तिक पारितोषिके

स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूः गणेश कालेल;
सर्वोत्कृष्ट फलंदाजः यश जाधव;
सर्वोत्कृष्ट गोलंदाजः हरी सावंत;
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. पारस चव्हाण;

💡

Frequently Asked Questions

  • Que: पिंपरी चिंचवड करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले?

    Ans: पिंपरी चिंचवड करंडक आंतरक्लब टी-20 क्रिकेट स्पर्धेत विन टेंपल क्लबने बजरंग दल संघाचा 4 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले.

  • Que: विन टेंपल क्लबच्या विजयात हरी सावंतचे योगदान काय होते?

    Ans: हरी सावंतने अष्टपैलू कामगिरी करत गोलंदाजीत 16 धावांत 3 बळी घेतले, तर फलंदाजीत नाबाद 43 धावांची खेळी केली.

Web Title: Win temple team win the pcmc cricket league beat bajrang dal hari sawant tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • cricket news
  • PCMC News
  • Sports News

संबंधित बातम्या

Marathon: ९० किलोमीटरचे आव्हान पेलले, आता शंभराव्या मॅरेथॉनची तयारी! धाराशिवच्या सुपुत्राची प्रेरणादायी कामगिरी
1

Marathon: ९० किलोमीटरचे आव्हान पेलले, आता शंभराव्या मॅरेथॉनची तयारी! धाराशिवच्या सुपुत्राची प्रेरणादायी कामगिरी

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट

IND vs NZ : राहुलचे शतक पूर्ण; भारतीय संघाची धावसंख्या 260 च्या पार
3

IND vs NZ : राहुलचे शतक पूर्ण; भारतीय संघाची धावसंख्या 260 च्या पार

Shrikant Shinde: ७५ हजार खेळाडू, ३२ खेळ आणि ऑलिम्पिकचा ध्यास; ठाण्यात खासदार क्रीडा संग्राम’चे उद्घाटन
4

Shrikant Shinde: ७५ हजार खेळाडू, ३२ खेळ आणि ऑलिम्पिकचा ध्यास; ठाण्यात खासदार क्रीडा संग्राम’चे उद्घाटन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.