Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Sooryavanshi: चाहत्यांसाठी खुषखबर, 8 दिवसातच पुन्हा खेळणार वैभव; कोण आहे कॅप्टन, कोणत्या टीमशी करणार दोन हात?

इंडियन प्रीमियर लीग २०२६ मधील शानदार फलंदाज वैभव सूर्यवंशी लवकरच भारत 'अ' संघाकडून खेळताना दिसू शकतो. श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी त्याची निवड झाली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 02, 2026 | 10:06 AM
८ दिवसात खेळणार वैभव सूर्यवंशी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

८ दिवसात खेळणार वैभव सूर्यवंशी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • भारत ए संघातून वैभव सूर्यवंशी खेळणार
  • श्रीलंका क्रिकेट ए संघाच्या विरूद्ध खेळणार भारत संघ 
  • ९ जूनपासून ट्रायसिरीजला सुरूवात 
२०२६ इंडियन प्रीमियर लीग संपल्यामुळे, वैभव सूर्यवंशीच्या पहिल्या भारतीय संघ निवडीसाठी काउंटडाउन सुरू झाले आहे. त्याला पुन्हा मैदानात पाहण्यासाठी आता सर्वांच्या नजरा निवड समितीवर लागल्या आहेत. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीच्या संघात त्याचा समावेश होईल का? त्याला पुन्हा मैदानात पाहण्यासाठी चाहत्यांना फक्त नऊ दिवस वाट पाहावी लागेल. वैभव सूर्यवंशीने यावर्षी तुफान क्रेझ निर्माण केली आहे. त्याने आयपीएलमध्ये सर्वांना मागे सोडत ७०० च्या वर धावांचा डोंगर तर रचलाच. याशिवाय अनेक पुरस्कारही पटकावले. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने वैभव टीम इंडियासाठी खेळणार असल्याचे संकेत दिले होते. या खेळाडूची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याचेही दिसून येत आहे. काही कालावधीतच इन्स्टाग्रामवर वैभवचे 6.2 M इतके फॉलोअर्स झाले आहेत. 

खांद्यावर टॉवेल अन् तोंडाला काळा मास्क! एअरपोर्टवर दिसला ‘बिहारी बाबू’; IPL च्या बॉसचा Video Viral

श्रीलंकेचा दौरा 

हा १५ वर्षीय खेळाडू आता ५० षटकांचे क्रिकेट (लिस्ट ए क्रिकेट) खेळताना दिसणार आहे. इंडिया ‘ए’ संघ त्रिकोणीय मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या स्पर्धेत, टीम इंडिया ‘ए’चा सामना श्रीलंका ‘ए’ आणि अफगाणिस्तान ‘ए’ संघांशी होईल. ही स्पर्धा ९ जून रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना २१ जून रोजी होणार आहे. सर्व सामने दंबुल्ला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळले जातील. ही सिरीज ट्रायसिरीज असून यात भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या तीन संघाचा समावेश असणार आहे. यामध्ये वैभव कसा खेळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

तिलक वर्मा कर्णधार

भारतीय संघाचे कर्णधारपद तिलक वर्मा भूषवणार आहे, तर ऋतुराज गायकवाड उपकर्णधार असेल. सुरुवातीला रियान परागची तिलकचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. वैभवचा भारत ‘अ’ संघाकडून पहिला लिस्ट ‘अ’ सामना. यापूर्वी तो गेल्या वर्षी कतारमध्ये झालेल्या इमर्जिंग एशिया कपमध्ये भारतीय संघाच्या शॅडो टीमकडून टी-२० फॉरमॅटमध्ये खेळला होता. भारत ‘अ’ संघ या दौऱ्यावर श्रीलंका ‘अ’ संघाविरुद्ध दोन प्रथम-श्रेणी (चार दिवसीय) सामनेही खेळणार आहे. या सामन्यासाठीचा संघ अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही.

संभाव्य भारत ‘अ’ संघ: तिलक वर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष बडोनी, निशांत सिंधू, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), विप्रज निगम, यश ठाकूर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज, अर्शद खान.

‘मी आता दूध पीत नाही तर…’; सिक्सर किंग Vaibhav Sooryavanshi चे ‘पॉवर हिटिंग’ वर भन्नाट उत्तर

Web Title: Vaibhav sooryavashi will be seen in action in 8 days against sri lanka for tri series start on 9th june

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • India Team
  • Tri Series
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy 2026: ईशान किशनची बॅट तळपली! फायनलमध्ये ठोकले खणखणीत शतक; पहिल्या दिवशी ईस्ट झोन मजबूत स्थितीत
1

Duleep Trophy 2026: ईशान किशनची बॅट तळपली! फायनलमध्ये ठोकले खणखणीत शतक; पहिल्या दिवशी ईस्ट झोन मजबूत स्थितीत

फायनलमध्ये मैदानात ‘राडा’! चालू सामन्यात Tilak Varma-Vaibhav Sooryavanshi भिडले; वाद वाढताच अंपायरही धावला, Video Viral
2

फायनलमध्ये मैदानात ‘राडा’! चालू सामन्यात Tilak Varma-Vaibhav Sooryavanshi भिडले; वाद वाढताच अंपायरही धावला, Video Viral

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
3

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.