वैभव सूर्यवंशी टी इंडियाकडून खेळणार (फोटो- सोशल मीडिया)
आयपीएलमध्ये ऑरेंज कपचा मानकरी ठरला वैभव सूर्यवंशी
15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने केले अनेक मोठे रेकॉर्डस
लवकरच टीम इंडिया ए मधून खेळताना दिसणार
BCCI On Vaibhav Suryavnahsi: आयपीएल 2026 चा हंगाम नुकताच पार पडला. आयपीएल 2026 चे विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पटकावले आहे. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. तर ऑरेंज कॅपचा मानकरी वैभव सूर्यवंशी ठरला आहे. सध्या सर्वत्र त्याच्या कामगिरीची चर्चा सुरू आहे. लवकरच तो भारतीय संघात खेळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने तसे संकेत दिले आहेत.
वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये आपल्या कामगिरीने सर्वांना चकित केले आहे. एकाच आयपीएल हंगामात वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम केला आहे. तसेच वेगवान शतक आणि आणि वेगवान 1000 रन्स पूर्ण करण्याचा रेकॉर्ड त्याने त्याच्या नावावर केला आहे. त्यामुळे वैभवसाठी टीम इंडियाची दारे खुली होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. आता याबाबत बीसीसीआयने तसे संकेत दिले आहेत.
आयपीएलचा अंतिम सामना झाल्यावर बीसीसीआयचे सचिव यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे. ‘वैभव सूर्यवंशीमध्ये शानदार प्रतिभा आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल असणार आहे. वैभव सर्व प्रकारचे क्रिकेट खेळू शकेल यासाठी बीसीसीआय पूर्ण प्रयत्न करेल.’ यानंतर वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियात खेळण्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
पुढचा ‘विराट’ की ‘तेंडुलकर’? 15 वर्षांच्या Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ; पहा ‘हे’ भीमकाय रेकॉर्ड्स
Vaibhav Suryavanshi चे ‘हे’ भीमकाय रेकॉर्ड्स
1. सर्वाधिक सिक्सर मारण्याचा रेकॉर्ड:राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशी सलामीवीर म्हणून खेळत होता. आक्रमक फलंदाजीसाठी तो ओळखला जात आहे. त्याने आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने तब्बल 72 सिक्स मारले आहेत. त्याने ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला आहे.
2. पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक रन्स: वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने अनेकांना चकित केले आहे. ख्रिस गेल, सचिन तेंडुलकर यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे. आयपीएलमध्ये 6 ओव्हर्सचा पॉवर प्ले असतो. त्या पॉवर प्लेमध्ये त्याने सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने पॉवर प्ले मध्ये 500 पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत.
IPL 2026: Vaibhav Sooryavanshi वर पैशांचा पाऊस, Orange Cap सह ‘या’ पुरस्कारांवरही मिळवला कब्जा
3. अनकॅप्ड खेळाडूच्या सर्वाधिक रन्स: 15 वर्षीय डावखुरा फलंदाज असणाऱ्या वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामात अनेक विक्रम मोडले आहेत. त्याने यंदाच्या हंगामात 776 रन्स केल्या आहेत. ऑरेंज कॅपचा तो मानकरी ठरला होता. मात्र यामध्ये खास गोष्ट अशी की अनकॅप्ड खेळाडू असणाऱ्या वैभवने सर्वाधिक रन्स केल्या आहेत.






