Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Sooryavanshi: ‘IPL गाजवलं, आता टीम इंडियासाठी पूर्णपणे सज्ज’, वैभव सूर्यवंशीबद्दल कुमार संगकाराचे मोठे विधान

kumar Sangakkara On Vaibhav Sooryavanshi Team India Selection: वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज आहे का यावर संघाचे प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी मोठे विधान केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 30, 2026 | 02:49 PM
Vaibhav Sooryavanshi: ‘IPL गाजवलं, आता टीम इंडियासाठी पूर्णपणे सज्ज’, वैभव सूर्यवंशीबद्दल कुमार संगकाराचे मोठे विधान
Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी पूर्णपणे सज्ज
  • कुमार संगकारांचे मोठे विधान
  • १५ वर्षीय सूर्यवंशीची तुफान खेळी
गुजरात टायटन्सविरुद्ध ७ विकेट्सने पराभव झाल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा आयपीएल २०२६ मधील प्रवास क्वालिफायर २ मध्येच संपला, परंतु संघाचा युवा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी संपूर्ण स्पर्धेत चर्चेचा विषय ठरला. IPL 2026 मध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीबद्दल राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी मोठे विधान केले आहे. वैभव आता भारतीय संघासाठी खेळण्यास “पूर्णपणे तयार” असल्याचे संगकारांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात वैभवला टीम इंडियामध्ये संधी मिळण्याची चर्चा अधिक रंगली आहे.

Asian Game: विनेश फोगाट आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी दाखल; 53 किलो वजनी गटात स्पर्धा; IG स्टेडियमला छावणीचे स्वरूप

कुमार संगकारा यांचा वैभवसाठी विश्वास

गुजरात विरुद्ध सामना हरल्यानंतर राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक संगकारा पत्रकार परिषेजेत म्हणाले की, ‘माझ्या मते, एखादा खेळाडू मैदानात उतरेपर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पूर्णपणे सज्ज आहे की नाही हे सांगता येत नाही. पण या आयपीएलमध्ये जगातील काही सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध वैभवची कामगिरी पाहता, मी म्हणू शकतो की तो कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे. मला खात्री आहे की त्याला लवकरच भारतीय संघात स्थान मिळेल.’

वैभवने सांभाळली संघाची सलामीची जबाबदारी

संगकारा यांनी वैभवच्या फलंदाजीचे कौतुक केले ते पुढे म्हणाले, ‘या युवा फलंदाजाने संपूर्ण हंगामात उत्तम परिपक्वता दाखवली आणि संघासाठी सलामीच्या भागीदारीची जबाबदारी खूप चांगल्या प्रकारे सांभाळली. केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही राजस्थान रॉयल्सचा सपोर्ट स्टाफ वैभवला योग्य दिशेने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. ते पुढे म्हणाले, आमच्याकडे त्याच्यासाठी एक चांगली योजना आहे. आम्ही त्याच्या मनात अनावश्यक गोष्टी भरत नाही. तो आमच्या संघाच्या सर्व बैठकांना उपस्थित राहतो, आपले मत देतो आणि लक्षपूर्वक ऐकतो. तो खूप मेहनत करतो, गोलंदाजांचा अभ्यास करतो, त्यांचे व्हिडिओ पाहतो आणि सामन्यांपूर्वी कसून तयारी करतो. त्याने आपले मन शांत ठेवावे आणि त्याच निर्भयतेने फलंदाजी करावी, अशी आमची इच्छा आहे.’

ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये वैभव आघाडीवर

१५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने IPL 2026 मध्ये दमदार प्रदर्शन करत क्रिकेटविश्वाला थक्क केले. राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना त्याने २३७ च्या स्ट्राइक रेटने  १६ सामन्यांत ७७६ धावा केल्या. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे राजस्थान संघ क्वालिफायर-2 पर्यंत पोहोचला. तो सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. परंतु, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांना अंतिम सामन्यात त्याला मागे टाकण्याची एक संधी मिळेल. शुक्रवारी झालेल्या क्वालिफायर-2 सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध वैभवने ४७ चेंडूत ९६ धावांची विस्फोटक खेळी केली. यामध्ये ८ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. या सामन्यात राजस्थानला जरी पराभव स्वीकारावा लागला, तरी वैभवच्या खेळीने सर्वांची मने जिंकली. मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी दाखवलेल्या विश्वासानंतर आगामी भारताच्या टी-20 मालिकांसाठी वैभव सूर्यवंशीच्या नावाची चर्चा जोरात सुरू झाली आहे.

RR vs GT: शेवटपर्यंत लढला अन्…डोळ्यात आले पाणी; फायनलचे स्वप्नं भंंगले, Vaibhav Sooryavanshi रोखू शकला नाही अश्रू

Web Title: Vaibhav suryavanshi ready for team india kumar sangakkara big statement ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • IPL 2026
  • IPL 2026 Auction
  • Kumar Sangakkara
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

‘युवराज सिंह माझे आदर्श आहेत…’ Vaibhav Sooryavanshi झाला भावूक, विम्बल्डनच्या कोर्टवर वैभवचा स्वॅग
1

‘युवराज सिंह माझे आदर्श आहेत…’ Vaibhav Sooryavanshi झाला भावूक, विम्बल्डनच्या कोर्टवर वैभवचा स्वॅग

IND vs ENG: फ्लॉप फलंदाजांवर कोणतीही कारवाई नाही, मग Abhishek – Vaibhav वर कशासाठी BCCI नाराज?
2

IND vs ENG: फ्लॉप फलंदाजांवर कोणतीही कारवाई नाही, मग Abhishek – Vaibhav वर कशासाठी BCCI नाराज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.