वैभव सूर्यवंशी (फोटो- सोशल मीडिया)
वैभव सूर्यवंशीची निवड ईस्ट झोन संघाचा उपकर्णधार म्हणून झाली आहे. आयपीएल आणि त्यानंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये स्फोटक फलंदाजी केल्यानंतर आता तो दलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. वैभव सूर्यवंशीची या ट्रॉफीमध्ये कसोटी लागणार आहे. आपला खेळ सुधारण्याची आणि उंचवण्याची मोठी संधि त्याच्याकडे असणार आहे.
सामना कधी आणि किती वाजता सुरु होणार?
रविवार – २३ ऑगस्ट २०२६
वेळ – सकाळी ९.३० वाजता सकाळी
कालावधी – चार दिवस
Duleep Trophy: BCCI ने दलिप ट्रॉफी फायनलची जागा बदलली, आता बंगळुरू नाही तर ‘इथे’ रंगणार सामना
भारतीय देशांतर्गत क्रिकेट हंगामाची दमदार सुरुवात दलीप ट्रॉफी २०२६-२७ स्पर्धेने होत आहे. या प्रतिष्ठेच्या प्रथम श्रेणी (Red-Ball) स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले असून २३ ऑगस्ट पासून बाद फेरीच्या सामन्यांना सुरुवात होत आहे.
स्पर्धेचे स्वरूप आणि वेळापत्रक
स्पर्धेचा कालावधी: २३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२६
फॉर्मेट: ४ दिवसीय बाद फेरी
वेळ: सर्व सामने रोज सकाळी ९:३० वाजता सुरू होतील
पहिल्या फेरीचे सामने – २३ ते २६ ऑगस्ट
ईस्ट झोन विरुद्ध नॉर्थ ईस्ट झोन (BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स, बेंगळुरू)
नॉर्थ झोन विरुद्ध वेस्ट झोन (BCCI सेंटर ऑफ एक्सलन्स, बेंगळुरू)
दलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या स्थळातील बदलाची घोषणा करताना BCCI चे सचिव देवजित सैकिया यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये प्रेक्षकांच्या संख्येवर काही मर्यादा असल्याने अंतिम सामना चेन्नईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दलीप ट्रॉफी ही आपल्या देशांतर्गत कॅलेंडरमधील एक प्रमुख प्रथम-श्रेणी स्पर्धा आहे आणि याच कारणास्तव, चाहत्यांना स्टेडियममध्ये अंतिम सामना पाहण्याची संधी मिळावी अशी आमची इच्छा आहे. दुलीप ट्रॉफीचे सर्व सामने थेट प्रक्षेपित केले जातील, तर एक उपांत्यपूर्व फेरीचा, एक उपांत्य फेरीचा आणि अंतिम सामना टीव्हीवर थेट प्रसारित केला जाईल.






