
ट्रॉफी वादावर वरुण चक्रवर्तीने साधला मोहसिन नकवींवर निशाणा (Photo Credit- X)
आशिया कपचे विजेतेपद जिंकल्यानंतर वरुण चक्रवर्ती कॉफीच्या कपसोबत पोज देताना दिसला होता. ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या कार्यक्रमात वरुणने पहिल्यांदाच या ट्रॉफी वादाबद्दल आणि त्याच्या सेलिब्रेशनबद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली. तो म्हणाला: “मला माहित होते की आम्ही स्पर्धा जिंकू, कारण जेव्हा आम्ही पाकिस्तानविरुद्धचा दुसरा सामना जिंकलो, तेव्हाच मला खात्री झाली होती की आम्ही अंतिम फेरीत त्यांच्याशी खेळू आणि आम्ही स्पर्धा जिंकणार. म्हणूनच मी सर्व काही नियोजन केले होते. मला वाटले होते की मी कपसोबत झोपलेला माझा फोटो काढेन.”
“Cup cheen sakte hain but…”: Varun Chakravarthy takes dig at ACC chief Naqvi for not handing over Asia Cup trophy Read @ANI Story | https://t.co/3dR5PYq5k9#VarunChakravarthy #AsiaCup #TeamIndia #MohsinNaqvi #cricket pic.twitter.com/mrtBJ8duax — ANI Digital (@ani_digital) October 16, 2025
क्रिकेटमध्ये नवीन फॉरमॅटचा जन्म! ना कसोटी-वनडे, ना टी-२०; मैदानात रंगेल आता ‘या’ फॉरमॅटचा थरार..
वरुण चक्रवर्ती पुढे म्हणाला, “तथापि, सामन्यानंतर माझ्याकडे कॉफीच्या कपशिवाय दुसरे काहीही नव्हते. म्हणून, मी त्यासोबतच माझा आनंद साजरा करू लागलो. मला माहित होते की आम्ही प्रत्येक सामना जिंकणार आहोत. आम्ही जगातील नंबर वन संघ आहोत. ते आमच्याकडून फक्त कप हिसकावून घेऊ शकतात, पण आम्हीच चॅम्पियन आहोत.”
वरुण चक्रवर्तीची आशिया कप २०२५ मध्ये कामगिरी उत्कृष्ट होती. वरुणने ६ सामन्यात एकूण ७ विकेट्स घेतल्या. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात वरुणची जादू शिगेला पोहोचली होती. त्याने ४ षटकात ३० धावा देत २ मोठ्या विकेट्स घेतल्या. वरुणने शाहिबजादा फरहान आणि फखर जमान यांचे विकेट्स घेतले, ज्यांनी पाकिस्तानला जलद सुरुवात दिली होती. वरुणचा स्पेल टीम इंडियासाठी खूप निर्णायक ठरला.
T20 World Cup 2026 साठी सर्व २० संघ निश्चित; ‘या’ संघाने मिळवली स्पर्धेतील ‘शेवटची’ जागा!