T20 World Cup 2026 साठी सर्व २० संघ निश्चित (Photo Credit- X)
T20 World Cup 2026 Teams List: ओमानच्या मस्कट येथे नुकत्याच पार पडलेल्या टी-२० वर्ल्ड कप एशिया आणि ईस्ट आशिया-पॅसिफिक क्वालिफायर २०२५ स्पर्धेच्या सुपर-६ स्टेजमध्ये दमदार प्रदर्शन केल्यानंतर, आणखी तीन संघांनी आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी आपले स्थान निश्चित केले आहे. यासह, पुढील वर्षी भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळल्या जाणाऱ्या या मोठ्या स्पर्धेसाठी सर्व २० संघांची नावे आता निश्चित झाली आहेत. या स्पर्धेसाठी पात्र होणारा अखेरचा संघ म्हणून संयुक्त अरब अमिराती (UAE) संघाने आपले स्थान पक्के केले. UAE ने ओमानच्या मैदानावर जपानचा एकतर्फी पराभव करून विश्वचषकाचे तिकीट मिळवले.
UAE lock in their place at next year’s #T20WorldCup in India & Sri Lanka 🔒🇦🇪 To know more 📲 https://t.co/RJPYa5d6ZZ pic.twitter.com/crHGViYy3O — ICC (@ICC) October 16, 2025
UAE आणि जपान यांच्यातील या क्वालिफायर सामन्यात UAE ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. जपानचा संघ २० षटकांत ९ विकेट्स गमावून फक्त ११६ धावाच करू शकला. UAE ने हे लक्ष्य केवळ १२.१ षटकांत २ विकेट्स गमावून सहज गाठले. अलीशान शराफू (४६ धावा) आणि कर्णधार मोहम्मद वसीम (४२ धावा) यांनी निर्णायक खेळी केली. या क्वालिफायरमधून UAE सोबतच नेपाळ आणि ओमाननेही टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी पात्रता मिळवली आहे.
IND VS AUS : ऑस्ट्रेलियाची आता खैर नाही! ‘रो-को’ने सराव सत्रात मैदानात गाळला घाम;पहा Video
पुढील वर्षी होणाऱ्या या विश्वचषकामध्ये एकूण २० संघांमध्ये विजेतेपदाची लढत होईल. यामध्ये खालील संघांचा समावेश आहे:
पात्रता निकष | पात्र झालेले संघ |
यजमान देश (Host) | भारत आणि श्रीलंका |
मागील वर्ल्ड कप (सुपर-८) | अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि वेस्ट इंडिज |
रँकिंग (Ranking) | आयर्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान |
क्वालिफायर स्पर्धा | कॅनडा (अमेरिका क्वालिफायर), इटली, नेदरलँड्स (युरोप क्वालिफायर), नामिबिया, झिम्बाब्वे (आफ्रिका क्वालिफायर), नेपाळ, ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) |
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेची सुरुवात २००७ मध्ये झाली होती. मागील (२०२४) एडिशनचा विजेता संघ भारत होता आणि ते यावेळेस आपले विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरतील. भारत, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांनी प्रत्येकी २-२ वेळा हा किताब जिंकला आहे, तर पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांनी प्रत्येकी एकदा बाजी मारली आहे.