Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Varun Chakaravarthy: वरुण चक्रवर्तीने रचला इतिहास! ICC T20 रँकिंगमध्ये बनला जगातील नंबर 1 गोलंदाज

वरुण चक्रवर्ती टी-२० रँकिंगमध्ये तो जगातील नंबर १ गोलंदाज बनला आहे. जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई नंतर, टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा तो तिसराच भारतीय खेळाडू ठरला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 17, 2025 | 03:22 PM
वरुण चक्रवर्तीने रचला इतिहास! (Photo Credit- X)

वरुण चक्रवर्तीने रचला इतिहास! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • वरुण चक्रवर्तीने रचला इतिहास!
  • ICC T20 रँकिंगमध्ये बनला जगातील नंबर 1 गोलंदाज
  • इतर रँकिंगमध्ये भारताचे वर्चस्व

ICC T20 Rankings: भारताचासाठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरणारा वरुण चक्रवर्तीसाठी (Varun Chakaravarthy)आशिया कपमध्ये एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या ताज्या टी-२० रँकिंगमध्ये तो जगातील नंबर १ गोलंदाज बनला आहे. जसप्रीत बुमराह आणि रवी बिश्नोई नंतर, टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचणारा तो तिसराच भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने न्यूझीलंडच्या जेकब डफीला मागे टाकत हे स्थान पटकावले आहे. वरुण चक्रवर्ती ७३३ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे, तर जेकब डफी ७१७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी

वरुण चक्रवर्ती व्यतिरिक्त, रवी बिश्नोई टी-२० क्रमवारीत टॉप १० मध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय आहे. बिश्नोई आता ८ व्या स्थानावर आहे. याशिवाय, अक्षर पटेल १२ व्या क्रमांकावर आहे. फिरकीपटू कुलदीप यादवनेही चांगली कामगिरी करत १६ स्थानांनी मोठी झेप घेतली असून, तो ६०४ रेटिंग गुणांसह २३ व्या स्थानावर पोहोचला आहे.

🚨 VARUN CHAKRAVARTHY – THE NEW NO.1 RANKED T20I BOWLER. 🚨

– The magic of Varun CV. 🇮🇳🔥 pic.twitter.com/KBMIIkC5Qo

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 17, 2025

वरुण चक्रवर्तीने रचला इतिहास

टी-२० मध्ये नंबर १ रँकिंगवर पोहोचणे ही वरुण चक्रवर्तीसाठी एक महत्त्वाची कामगिरी आहे. हा विक्रम करणारा तो तामिळनाडूचा पहिला खेळाडू आहे. त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २०१२ मध्ये पदार्पण केले. आतापर्यंत २० टी-२० सामने खेळताना त्याने ३५ विकेट्स घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्तीचा इकॉनॉमी रेट फक्त ६.८३ आहे आणि त्याने दोन वेळा ५-बळी घेण्याची कामगिरी केली आहे.

Asia Cup 2025: ‘भारताने विजेतेपद जिंकल्यास…’, सूर्यकुमार यादव ACC अध्यक्ष मोहसीन नकवीकडून घेणार नाही ट्रॉफी

आशिया कपमधील ‘ट्रम्प कार्ड’

आशिया कपमध्ये वरुण चक्रवर्ती टीम इंडियासाठी ‘ट्रम्प कार्ड’ ठरला आहे. त्याने दोन सामन्यांमध्ये फक्त दोन विकेट्स घेतल्या असल्या तरी, त्याचा इकॉनॉमी रेट उत्तम राहिला आहे. विशेष म्हणजे तो पॉवरप्लेपासून ते डेथ ओव्हर्सपर्यंत कोणत्याही टप्प्यात गोलंदाजी करू शकतो. दुबई आणि अबू धाबी येथील खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी अनुकूल असल्यामुळे वरुण तेथे प्रभावी कामगिरी करू शकतो. कुलदीप यादवनेही गेल्या दोन सामन्यांत दोन सामन्यांमध्ये सात विकेट्स घेत शानदार कामगिरी केली आहे.

इतर रँकिंगमध्ये भारताचे वर्चस्व

आयसीसी टी-२० अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताचा हार्दिक पंड्या पहिल्या स्थानावर आहे. फलंदाजांच्या क्रमवारीतही भारत अव्वल स्थानी आहे. अभिषेक शर्मा ८८४ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या यादीत तिलक वर्मा दोन स्थानांनी घसरून चौथ्या स्थानावर आला आहे, तर सूर्यकुमार यादव सहाव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे.

Web Title: Varun chakravarthy creates history becomes worlds number 1 bowler in icc t20 rankings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • ICC
  • ICC Rankings
  • Sports
  • Sports News
  • T20 cricket
  • Team India
  • Varun Chakaravarthy

संबंधित बातम्या

Asia Cup 2025: ‘भारताने विजेतेपद जिंकल्यास…’, सूर्यकुमार यादव ACC अध्यक्ष मोहसीन नकवीकडून घेणार नाही ट्रॉफी
1

Asia Cup 2025: ‘भारताने विजेतेपद जिंकल्यास…’, सूर्यकुमार यादव ACC अध्यक्ष मोहसीन नकवीकडून घेणार नाही ट्रॉफी

Bangladesh Vs Afghanistan: अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशने मारली बाजी, अफगाणिस्तानची लढाई पडली अपुरी
2

Bangladesh Vs Afghanistan: अटीतटीच्या सामन्यात बांगलादेशने मारली बाजी, अफगाणिस्तानची लढाई पडली अपुरी

AFG vs BAN: बांगलादेशने ‘करो या मरो’ सामन्यात अफगाणिस्तान दिले १५५ धावांचे आव्हान; कोण पोहचणार सुपर-४ मध्ये?
3

AFG vs BAN: बांगलादेशने ‘करो या मरो’ सामन्यात अफगाणिस्तान दिले १५५ धावांचे आव्हान; कोण पोहचणार सुपर-४ मध्ये?

Asia cup 2025 : करो या मरोच्या सामन्यात बांगलादेशचा Toss जिंकून फलंदाजीचा निर्णय; अफगाणी फिरकीचे असणार आव्हान 
4

Asia cup 2025 : करो या मरोच्या सामन्यात बांगलादेशचा Toss जिंकून फलंदाजीचा निर्णय; अफगाणी फिरकीचे असणार आव्हान 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.