Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli: क्रिकेटचा बादशाह! रनमशीन ‘विराट कोहली’चा विश्वविक्रमांचा धडाका; किंगचे असे रेकॉर्ड,जे मोडणं भल्याभल्यांना जमणार नाही

Virat Kohli 38th Birthday 10 Unbreakable World records: आज विराट कोहलीचा ३८वा वाढदिवस आहे. या महान क्रिकेटपटूने आपल्या कारकिर्दीत असंख्य विक्रम मोडले आहेत. पण तुम्हाला माहितीये का, विराट कोहलीचे काही असे रेकॉर्ड्स हे मोडणे अशक्य आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 05, 2026 | 02:06 PM
virat kohli

virat kohli

Follow Us
Follow Us:
  • विराट कोहलीचा मैदानावर दबदबा
  • विक्रमांसमोर जगातील दिग्गजही फिके
  • विराटचे ऐतिहासिक विक्रम
Virat Kohli 38th Birthday: विराट कोहली हा जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि गेल्या १८ वर्षांपासून तो भारताचा सर्वात मोठा मॅच-विनिंग खेळाडू ठरला आहे. आज ‘रन मशीन’ विराट कोहलीचा वाढदिवस आहे, तो ३८ वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म ५ नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीत झाला. कोहलीने आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण विक्रम प्रस्थापित केले आहेत. पण, तुम्हाला माहितीये का, विराट कोहलीच्या असे विक्रम जे मोडणे केवळ कठीणच नाही, तर अशक्य आहे. जाणून घेऊयात.

WPL 2027 चं वेळापत्रक जाहीर! ट्रॉफीसाठी भिडणार पाच संघ; कधी, कुठे अन् केव्हा रंगणार थरार? पाहा संपूर्ण शेड्यूल

किंग कोहलीचे ‘विराट’ विक्रम

एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतक

विराट कोहलीच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५५ शतके आहेत. सचिन तेंडुलकर ४९ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता एकदिवसीय क्रिकेट कमी प्रमाणात खेळले जात असल्याने, कोणत्याही नवीन फलंदाजासाठी विराटचा ५५ शतकांचा विक्रम मोडणे अशक्य आहे.

एकाच आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा

विराट कोहलीने आयपीएल २०२६ मध्ये १६ सामने खेळून ९७३ धावा केल्या. एकाच आयपीएल हंगामात कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. दहा वर्षे उलटून गेली आहेत, तरीही हा विक्रम अबाधित आहे.

लीगल चेंडूशिवाय घेतलेली विकेट

टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लीगल म्हणजेच वैध चेंडूशिवाय विकेट घेणारा विराट कोहली हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. २०११ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात, विराटने आपल्या कारकिर्दीतील पहिला वाईड बॉल टाकला, ज्यामुळे केविन पीटरसन पुढे येऊन LBW झाला.

एकाच आयपीएल संघाकडून खेळणे

विराट कोहली आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासून आरसीबीकडून खेळला आहे. तो १८ वर्षे एकाच संघाशी एकनिष्ठ राहिला आहे.

सर्वात जलद १०,००० एकदिवसीय धावा

सर्वात जलद १०,००० एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याने २०५ डावांमध्ये हा टप्पा गाठला. सचिन तेंडुलकरने हा पराक्रम २५९ डावांमध्ये केला होता, तर विराट कोहलीने तो ५४ कमी सामन्यांमध्ये पूर्ण केला.

कर्णधाराने केलेली सर्वाधिक द्विशतके

सात द्विशतके झळकावणारा विराट कोहली हा एकमेव कसोटी कर्णधार आहे. त्याने ब्रायन लाराचा पाच द्विशतकांचा विक्रम मोडला. हा विक्रम मोडणे अत्यंत कठीण आहे.

एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक शतके

विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध १० शतके झळकावली आहेत. आपल्या कारकिर्दीत एकाच संघाविरुद्ध इतकी शतके करणारा दुसरा कोणताही खेळाडू नाही.

सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार

विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २२ वेळा मालिकावीर पुरस्कार जिंकले आहेत. इतर कोणत्याही खेळाडूने ही कामगिरी केलेली नाही.

सर्वात जलद २८,००० धावा

विराट कोहलीने ६२४ डावांमध्ये २८,००० धावा पूर्ण केल्या. त्याने सचिन तेंडुलकरचा ६४४ डावांचा विक्रम मोडला. मात्र, आता हा विक्रम मोडणे कठीण आहे.

IND vs NZ: आधी किवींची दाणादाण उडवली; मग गर्लफ्रेंडसाठी भर मैदानात केली खास गोष्ट, Arshdeep Singhचं ‘त्या’ सेलिब्रेशनचा Video Viral

Web Title: Virat kohli 38th birthday 10 unbreakable cricket world records pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 01:58 PM

Topics:  

  • Happy Birthday virat kohli
  • King virat Kohli
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Virat Kohli Birthday: पत्नी अनुष्काला तर जग ओळखतं, विराटच्या कुटुंबात नक्की आहे तरी कोण-कोण? Virat Family Tree
1

Virat Kohli Birthday: पत्नी अनुष्काला तर जग ओळखतं, विराटच्या कुटुंबात नक्की आहे तरी कोण-कोण? Virat Family Tree

वनडेमध्ये शतकांचा खरा किंग कोण? विराट, सचिन की रोहित? आकडेवारी पाहून व्हाल थक्क
2

वनडेमध्ये शतकांचा खरा किंग कोण? विराट, सचिन की रोहित? आकडेवारी पाहून व्हाल थक्क

IND vs NZ: किवींचा खेळ खल्लास! विराट कोहलीची वादळी खेळी अन् अर्शदीपचा भेदक मारा; टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवले
3

IND vs NZ: किवींचा खेळ खल्लास! विराट कोहलीची वादळी खेळी अन् अर्शदीपचा भेदक मारा; टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवले

IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल
4

IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.