
न्यूझीलंडविरुद्ध वनडे सिरीज खेळणार कोहली
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे नुकतेच मुंबईत पाहायला मिळाले. गेल्या रविवारी मुंबईत आयोजित प्रसिद्ध अमेरिकन कीर्तनकार कृष्णा दास यांच्या भक्ती कार्यक्रमात या लोकप्रिय जोडीने हजेरी लावली असल्याचे म्हटले जात आहे. सध्या सोशल मीडियावर या कार्यक्रमातील त्यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, यामध्ये ते भक्तीगीतांवर तल्लीन झाल्याचे दिसून आले.
कृष्णा दास यांच्या या भक्ती कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी या स्टार कपलने मुंबईतील ऐतिहासिक गेटवे ऑफ इंडिया येथे भेट दिल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकन गायक कृष्णा दास यांच्या सध्या सुरू असलेल्या भारत दौऱ्याचाच एक भाग म्हणून मुंबईत या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिथे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा उपस्थित असल्याचे दिसून आले.
Anushka Sharma and Virat Kohli enjoying the Krishna Das concert. https://t.co/ZZezwKuMg5 — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 26, 2026
समोर आलेल्या व्हिडिओनुसार , अनुष्का शर्मा अगदी मनापासून दोन्ही डोळे मिटून आणि टाळ्या वाजवत असल्याचे डसून आले. तेव्हा अनुष्का शर्मा भक्तीत तल्लीन झाल्याचे दिसून येत आहे. तिच्या चेहऱ्यावरील शांतता आणि भक्तीभाव स्पष्टपणे जाणवत आहे. विराट कोहली देखील शांतपणे कीर्तनाचा आनंद घेताना दिसून येत आहेत. दोघांच्या या साध्या आणि अनौपचारिक पेहरावाने उपस्थितांसह सोशल मीडियावरील हजारो चाहत्यांची मने जिंकली आहेत. तसेच हा व्हिडिओ तूफान व्हायरल झाला आहे.
PHOTOS: अमित मिश्राने उडवली खळबळ; Virat अन् कुंबळेवर केले ‘हे’ आरोप
सध्या भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. तिथे तो सध्या टी 20 सिरीज खेळत आहे. तर लवकरच शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ वनडे सिरीज खेळणार आहे. या सिरीजमध्ये विराट कोहली देखील खेळताना दिसणार आहे. ४ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या वनडे सिरीजमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहे. चाहत्यांचे त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.
Ans: सोशल मिडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ हा विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा आहे.
Ans: न्यूझीलंडविरुद्ध वनडे सिरीजमध्ये विराट कोहली खेळताना दिसणार आहे