Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: आई आजारी पडली अन् 14 वर्षांच्या लेकाने करून दाखवलं असं काही; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

Viral Video: आईची तब्येत बिघडल्यामुळे 14 वर्षीय रूचित तनवर याने घरातील स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळली. त्याच्या आई निशा तनवर यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रूचित पीठ मळताना आणि चपात्या बनवताना दिसत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 26, 2026 | 11:59 AM
Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Viral Video: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आई आजारी पडताच 14 वर्षीय रूचितने सांभाळलं किचन.
  • चपात्या बनवतानाचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल.
  • रूचितसोबतच आईच्या संस्कारांचंही होतंय कौतुक.

Boy Helps Sick Mother: आई घरात आजारी पडली की संपूर्ण घराचं गणितच बिघडतं. रोज सकाळी उठून सगळ्यांसाठी डबा, नाश्ता, जेवण बनवणारी आई जेव्हा अंथरुणाला असते, तेव्हाच तिची खरी किंमत समजते. अशावेळी जर घरातल्या मुलाने पुढे येऊन म्हणावं की, “आई तू आराम कर, आजचं जेवण मी बनवतो,” तर त्यापेक्षा अधिक आनंदाचा क्षण आईसाठी कोणताच नसेल. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोकांच्या मनाला भिडत आहे.

आई आजारी असताना 14 वर्षाच्या मुलाने किचन सांभाळावा, त्यांची पूर्ण जबाबदारी घेतली आणि संपूर्ण जेवण तयार केले. त्याच्या या कृतीचा व्हिडिओ त्याच्या आईनेच सोशल मीडियावर शेअर करत सगळीकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. Viral Video:

व्हिडिओमध्ये काय आहे?

हा व्हिडिओ निशा तनवर नावाच्या महिलेने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये तिचा 14 वर्षांचा मुलगा रूचित किचनमध्ये पीठ मळताना दिसत आहे. निशाने सांगितलं की तिला खूप सर्दी, खोकला झाला होता, खूप थकवा आणि अशक्तपणा जाणवतं होता.

बेडवरुन उठणं पण कठीण वाटत होतं. अशा वेळी रूचितने स्वतःहून पुढे येऊन “मी करतो” असं सांगितलं. व्हिडिओत तो अगदी सफाईदारपणे पीठ मळतोय, चपात्या लाटतोय. बघून वाटतच नाही की तो पहिल्यांदाच किचनमध्ये आलाय.

Katihar Viral Video : बिहारच्या कटिहारमधील दसरा जत्रेत अपघात: ‘ब्रेक डान्स’ राईडवरून प्रवासी खाली

त्याला फक्त पीठच नाही तर सगळं येतं

रूचितच्या आईने सांगितलं की, रूचितला फक्त पीठ मळताच येत नाही, तर त्याला चपात्या पण छान बनवता येतात. एवढंच नाही तर तो भाजी पण बनवायला शिकतोय. हळूहळू तो किचनमधली बाकीची कामं पण शिकतोय. त्याच्यासाठी किचनमध्ये जाणं हे काही नवीन नाही, तो आधीपासूनच आईला मदत करत असतो.

आपल्याकडे अजूनही बऱ्याच घरांमध्ये असं चित्र असतं की मुलींना लहानपणापासूनच किचनची कामं शिकवली जातात, पण मुलांना मात्र लांब ठेवलं जातं. “तू हे करु नको ताई करेल तू कशाला किचनमध्ये आलास” हे असं अनेकदा महिला आपल्या मुलांना सांगतात.

घरकाम करणं ही काही लाजेची गोष्ट नाही. स्वतःच्या घराची जबाबदारी घेणं, आईला मदत करणं यातच खरं मोठेपण आहे. घर फक्त आईचं किंवा बहिणीचं नसतं, ते घरात राहणाऱ्या प्रत्येकाचं असतं. त्याची काळजी घेणं पण प्रत्येकाचं काम आहे.

आईच्या संस्कारांचं कौतुक

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर लोकांनी रूचितचं नाही तर त्याच्या आईचे पण खूप कौतुक केलं. कारण मुलावर असे संस्कार करणं सोपं नाही. मुलाला लहानपणापासूनच सगळी कामं शिकवणं, मुलगा-मुलगी असा भेदभाव न करणं हे त्या आईने केलं आहे. कमेंटमध्ये लोक म्हणत आहेत की, “प्रत्येक आईने आपल्या मुलाला असंच शिकवलं पाहिजे.” मुलीप्रमाणे मुलांना देखील घरातल्या कामांमध्ये विशेषत:हा किचन सांभाळला दिला गेला पाहिजे.”

Electric Shock Accident : बाल्कनीत गुटखा थुंकायला गेले, 11 हजार व्होल्टच्या विजेचा धक्का; वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

खरंच, या छोट्या व्हिडिओने समाजाला एक खूप मोठा संदेश दिला आहे. मुलांनाही स्वयंपाक शिकवा, त्यांना घरकामाची सवय लावा. उद्या ते एकटे राहिले तरी त्यांना कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही आणि घरच्यांना मदत पण करता येईल. रूचितसारखी मुलं आजकाल खूप कमी बघायला मिळतात आणि म्हणूनच त्याचं कौतुक जास्त होत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रूचितचा व्हिडिओ सोशल मीडियावर का व्हायरल झाला?

    Ans: आई आजारी असताना रूचितने स्वतःहून स्वयंपाकाची जबाबदारी घेतली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्याचं कौतुक होत आहे.

  • Que: व्हायरल व्हिडिओमध्ये रूचित काय करताना दिसतो?

    Ans: व्हिडिओमध्ये रूचित पीठ मळताना आणि चपात्या बनवताना दिसतो. तो भाजी बनवायलाही शिकत आहे.

  • Que: या व्हायरल व्हिडिओतून काय संदेश मिळतो?

    Ans: घरकाम आणि स्वयंपाक ही केवळ महिलांची जबाबदारी नाही. मुलगा आणि मुलगी दोघांनाही लहानपणापासून घरकाम शिकवणं महत्त्वाचं आहे.

Web Title: 14 year old boy cooks for sick mother viral video rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • Marathi News
  • viral video

संबंधित बातम्या

Shivali Parab: शिवाली परबची नवी इनिंग सुरू! अमेरिकेतून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
1

Shivali Parab: शिवाली परबची नवी इनिंग सुरू! अमेरिकेतून चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: राहुल गांधी निर्दोष, सुलतानपूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय
2

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: राहुल गांधी निर्दोष, सुलतानपूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय

Katihar Viral Video : बिहारच्या कटिहारमधील दसरा जत्रेत अपघात: ‘ब्रेक डान्स’ राईडवरून प्रवासी खाली
3

Katihar Viral Video : बिहारच्या कटिहारमधील दसरा जत्रेत अपघात: ‘ब्रेक डान्स’ राईडवरून प्रवासी खाली

ACB Trap : मातीच्या भरावासाठी लाचेचा व्यवहार ;सहा हजार रुपये घेताना वनपाल रंगेहात पकडला
4

ACB Trap : मातीच्या भरावासाठी लाचेचा व्यवहार ;सहा हजार रुपये घेताना वनपाल रंगेहात पकडला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.