फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर मालिका खेळत आहे. सध्या या मालिकेमध्ये १-१ अशी बरोबरी आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवला होता त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-१ अशी बरोबरी केली होती. तिसरा सामना अनिर्णयीत राहिला. चौथ्या सामन्यांमध्ये दोन्ही संघामध्ये टशन पाहायला मिळाली. त्याचबरोबर दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली. चौथा सामन्यात पहिल्याच दिनी भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज सॅम कॉन्स्टास यांच्यामध्ये गरामगरमीचे वातावरण पाहायला मिळाले.
युवा खेळाडूंच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत चमकदार कामगिरी करत आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन मीडियाला हे पचवता आलेले नाही आणि त्यामुळेच ते सातत्याने भारतीय खेळाडूंना लक्ष्य करत आहेत. या खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचे नाव आघाडीवर आहे, जो कांगारू फलंदाज सॅम कॉन्स्टाससोबत झालेल्या संघर्षानंतर पुन्हा त्यांच्या निशाण्यावर आहे.
आता एका वृत्तपत्राने निर्लज्जपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून विराटच्या दिवंगत वडिलांची खिल्ली उडवली आहे. वृत्तपत्राने आपल्या क्रीडा पानावर भारतीय फलंदाजाच्या वडिलांबद्दल अत्यंत खराब मथळा लिहिला. वृत्तपत्राने कांगारूंचा सलामीवीर सॅम कॉन्स्टासचा फोटो छापला होता आणि ‘विराट, मी तुझा पिता आहे’ अशा मथळ्यात लिहिले होते. त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहते सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियन मीडियाची शाळा घेण्यापासून अजिबात चुकलेले नाहीत. सोशल मीडियावर आता अनेक फोटो ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत.
Australia Media – Now it’s next level! 😬 Sunday Times features: ‘Virat, I am your father’ on yesterday’s back page. 👀#viratkohli #INDvsAUS #BorderGavaskarTrophy #patcummins #CricketAustralia pic.twitter.com/3PmNN2Z06T — Hamad Chaudhry (@iaChaudhary05) December 28, 2024
The back page of tomorrow’s The Sunday Times.@westaustralian @TheWestSport pic.twitter.com/2Oi1c1wx2a — Jakeb Waddell (@JakebWaddell) December 28, 2024
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी, कांगारू फलंदाज हातमोजे जुळवून क्रीजच्या दुसऱ्या टोकाला जात असताना कोहलीने कॉन्स्टान्सला खांद्यावर मारले. यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये काही वेळ वादावादी झाली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यात बहुतेक लोकांनी याला कोहलीची चूक मानली होती. नंतर रेफरीने विराटला मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावला, तोही त्याने मान्य केला. आयसीसीने गुरुवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विराटने आचारसंहितेच्या लेव्हल १ चे उल्लंघन केले आहे. आयसीसीने पुढे सांगितले की, या प्रकरणावर कोणत्याही औपचारिक सुनावणीची गरज नाही कारण विराटने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्टने प्रस्तावित केलेला दंड मान्य केला आहे.