
Virat Kohli – Gautam Gambhir controvers
भारतीय क्रिकेट संघ आजपासून इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात करत आहेत. या मालिकेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अनुभवी फलंदाज (Virat Kohli) विराट कोहलीचे पुनरागमन. दुखापतीमुळे काही सामने गमावलेल्या विराटने आता पूर्ण फिटनेस मिळवला असून तो पुन्हा एकदा भारतीय संघासाठी मैदानाता उतरणार आहे. त्याचबरोबर रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि कर्णधार शुभमन गिल त्याच्याकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत.
रोहित अन् विराट संघातून बाहेर पडणार? ‘गेल्या दशकापासून ते…’ Shubhman Gill चे मोठे विधान
मालिकेपुर्वी भारतीय संघाने जोरदार सराव केला. मात्र या सरावादरम्यान एक वेगळीच चर्चा रंगली. कोच गौतम गंभीर आणि विराटमध्ये कोणत्याही प्रकारचा संवाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोघांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना पु्न्हा उधाण आले आहे. अधिकृतरीत्या याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नसली, तरी सरावातील काही घडामोंडीमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
सरावावेळी गौतम गंभीर यांनी अनेक खेळांडूशी चर्चा केली. रोहित शर्मा, शुभमन गिल आणि केएल राहूल त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला. दुसरीकडे विराट कोहली फलंदाजीचा सराव करत असताना त्याच्याशी फलंदाजी प्रशिक्षकांनी चर्चा केली. त्यानंतर प्रशिक्षकांनी गंभीर त्यांच्यासोबत स्वतंत्र्यपणे संवाद साधला. मात्र विराट आणि गंभीर यांच्यात थेट बोलणे झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे सोशल मीडियावर विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत.
विराट आणि गौतम गंभीर यांच्यातील नाते यापूर्वीही अनेकदा चर्चेत राहिले आहे. आयपीएलमध्ये दोघांमध्ये वाद झाल्याच्या घटना सर्वांनी पाहिल्या आहेत. गंभीर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतरही अशा चर्चांना वेळोवेळी उधाण आले. मात्र या सर्व अफवांवर दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, विराट कोहली दुखापतीतून सावरून पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. त्यामुळे त्याच्या पुनरागमनामुळे भारतीय फलंदाजी अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. इंग्लंडसारख्या मजबूत संघाविरुद्ध त्याचा अनुभव संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.
राडा होणार पण BCCI नाही ऐकणार! Team India मध्ये येण्यासाठी Suryakumar Yadav ला करावे लागेल ‘हे’ काम
या वनडे मालिकेपूर्वी भारताला टी-20 मालिकेत निराशाजनक कामगिरी करावी लागली होती. त्यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीकेची झोड उठली होती. संघनिवड आणि काही खेळाडूंच्या वापराबाबतही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. आता वनडे मालिकेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
पहिला सामना बर्मिंगहॅम येथे खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे, २०२३ च्या विश्वचषकानंतर प्रथमच विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे तिघे एकाच वनडे सामन्यात एकत्र खेळताना दिसतील. आगामी २०२७ विश्वचषकाची तयारी लक्षात घेता ही मालिका भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे या मालिकेतून संघाची ताकद, संयोजन आणि पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.