Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI चा मोठा निर्णय! इंग्लंड आणि झिम्बाब्वे मालिकेतून हर्षित राणा-वरुण चक्रवर्ती बाहेर; नेमकं कारण काय?

harshit rana varun chakravarthy are ruled out from india's squad: इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात बदल करण्यात आले आहेत. हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 12, 2026 | 04:38 PM
BCCI चा मोठा निर्णय! इंग्लंड आणि झिम्बाब्वे मालिकेतून हर्षित राणा-वरुण चक्रवर्ती बाहेर; नेमकं कारण काय?
Follow Us
Follow Us:
  • टीम इंडियात मोठे बदल
  • मालिकेतून हर्षित राणा-वरुण चक्रवर्ती बाहेर
  • नेमकं कारण काय?
इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत व्हाईटवॉश मिळाल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघ आता इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज हर्षित राणा इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. दरम्यान, फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून वगळण्यात आले आहे. पुरुष निवड समितीने एकदिवसीय संघात हर्षितच्या जागी प्रिन्स यादवला आणि टी-२० संघात वरुणच्या जागी रवी बिश्नोईला स्थान दिले आहे.

Norway vs England: बेलिंगहॅमचा डबल धमाका! नॉर्वेवर मात करत इंग्लंडची सेमिफायनलमध्ये दमदार एन्ट्री

हर्षित राणा- वरुण चक्रवर्ती वनडे मालिकेतून बाहेर

बीसीसीआयने सांगितले की, ट्रेंट ब्रिज येथे इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान हर्षितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. तो इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर झाला असून पुढील उपचारांसाठी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) दाखल होईल. दुसरीकडे, वरुण चक्रवर्ती  तिसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान जखमी झाला. त्याच्या एमआरआयमध्ये ग्रेड २ हॅमस्ट्रिंगची दुखापत असल्याचे समोर आले आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार, वरुण झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर झाला आहे. तो देखील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (CoE) दाखल होईल.

टीम इंडिया वनडे मालिकेत करणार कमबॅक

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला ०-४ असा पराभव पत्करावा लागला होता. आता, भारतीय संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत कमबॅक करण्याचे प्रयत्न करेल. या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीची जोडी खेळताना पाहायला मिळणार आहे. यानंतर, २३ जुलैपासून भारतीय संघ झिम्बाब्वेचा दौरा करेल, जिथे तीन टी-२० सामने खेळले जातील.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला एकदिवसीय सामना- १४ जुलै , एजबास्टन (बर्मिंगहॅम) – दुपारी ३:३० वाजता
  • दुसरा एकदिवसीय सामना- १६ जुलै, सोफिया गार्डन्स (कार्डिफ) – सायंकाळी ५:३० वाजता
  • तिसरा एकदिवसीय सामना- १९ जुलै, लॉर्ड्स (लंडन) – दुपारी ३:३० वाजता
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अपडेटेड भारतीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव

झिम्बाब्वेविरुद्धच्या T20I मालिकेसाठी अपडेटेड भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, अशोक शर्मा,प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), रवी बिश्नोई.

Wimbledon 2026: लिंडा नोस्कोवा ठरली चॅम्पियन! पहिल्याच ग्रँड स्लॅम विजेतेपदावर कोरले नाव

Web Title: Bcci team india squad update harshit rana varun chakravarthy ruled out india vs england zimbabwe tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • IND VS ZIM
  • India vs England 3rd ODI

संबंधित बातम्या

ENG Vs IND: इंग्लंडच्याच भूमीत तिरंगा फडकला! ऐतिहासिक लॉर्ड्सवर ‘दादा’ स्टाईल जल्लोष; पाहा Viral Video
1

ENG Vs IND: इंग्लंडच्याच भूमीत तिरंगा फडकला! ऐतिहासिक लॉर्ड्सवर ‘दादा’ स्टाईल जल्लोष; पाहा Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.