फोटो सौजन्य - सोशल मीडिया
विराट कोहली – रणजी ट्रॉफी : टीम इंडियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये केलेल्या खराब कामगिरीमुळे भारताचे कोच गौतम गंभीर यांनी आणि बीसीसीआय भारताच्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या भारतीय संघाचे बरेच खेळाडू रणजी ट्रॉफीचे सामने खेळत आहेत. रणजीच्या काही सामन्यांमध्ये रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत आणि शुभमन गिल संघाचे भाग होते. आता भारताचा अनुभवी खेळाडू विराट कोहली आगामी रणजी ट्रॉफीचा सामना खेळणार आहे. आता सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यामध्ये कोहली सामन्यासाठी सज्ज झाला आहे.
IND vs ENG : अर्शदीप सिंगला तिसऱ्या T20 सामन्यात इतिहास रचण्याची संधी, हारिस रौफचा मोडू शकतो रेकॉर्ड
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्याच्या रणजी ट्रॉफी २०२४-२५ हंगामात रेल्वेविरुद्धच्या आगामी सामन्यासाठी सज्ज आहे. कोहली मंगळवारी दिल्लीला पोहोचला, तिथे तो विमानतळावर दिसला. मंगळवारी अरुण जेटली स्टेडियमवर तो उर्वरित संघासोबत सराव करेल अशी अपेक्षा आहे. विराट या सामन्यात दाखल होताच त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना पाहण्यासाठी चाहत्यांची १३ वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये गाझियाबादमध्ये दिल्लीचा उत्तर प्रदेशशी सामना झाला तेव्हा रणजी ट्रॉफीमध्ये तो शेवटचा खेळला होता. त्याने पहिल्या डावात १४ तर दुसऱ्या डावात ४३ धावा केल्या. मात्र या सामन्यात संघाला सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
VIRAT KOHLI HAS REACHED DELHI FOR RANJI TROPHY. 🐐pic.twitter.com/8LAuckXAIr — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 28, 2025
३० जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सामन्यात विराट दिल्ली संघाचे नेतृत्व करणार नाही आणि त्याऐवजी तो आयुष बडोनीच्या नेतृत्वाखाली खेळेल. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडल्यानंतर काही दिवसांनी विराटने रेल्वेविरुद्ध दिल्लीच्या सामन्यासाठी आपली उपलब्धता निश्चित केली होती. त्याच्या मानेला मोच आली होती आणि त्यामुळे २३ जानेवारीला होणाऱ्या दिल्ली सामन्यात तो खेळू शकला नव्हता. या सामन्यात दिल्लीला सौराष्ट्रविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.
३० जानेवारी २०२५ चा दिवस विराटच्या चाहत्यांसाठी तसेच दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (DDCA) साठी खूप खास आहे. यामुळेच यासाठी तो कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. डीडीसीएचे सचिव अशोक शर्मा म्हणाले की, असोसिएशनने दिल्ली पोलिसांना पत्र लिहून सामन्यासाठी सुरक्षा वाढवण्याची विनंती केली आहे, जेणेकरून चाहत्यांना कोणत्याही अडचणीशिवाय ऐतिहासिक सामन्याचा आनंद घेता येईल.
सामन्याच्या पहिल्या दिवशी सुमारे दहा हजार लोक येण्याची अपेक्षा आहे, यावरून कोहलीची प्रचंड लोकप्रियता आणि त्याच्या पुनरागमनाबद्दलचा उत्साह दिसून येतो. यासोबतच डीडीसीए चाहत्यांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करेल आणि स्वच्छतागृहे पूर्णपणे स्वच्छ असल्याची खात्रीही करेल.