फोटो सौजन्य - सोशल मीडिया
अर्शदीप सिंग रेकॉर्ड : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा T20 सामना आज 28 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन राजकोट येथे करण्यात आले आहे. भारताच्या संघाने या पाच सामान्यांच्या सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, त्यामुळे टीम इंडिया ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. अशा स्थितीत टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेण्याची संधी आहे. त्याचबरोबर या सामन्यात टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
IND vs AUS : टीम इंडियाचा उपकर्णधार अक्षर पटेल नव्या भूमिकेत! बीसीसीआयने शेअर केला खास व्हिडीओ
अर्शदीप सिंग तिसऱ्या T२० मध्ये मोठा विक्रम करण्याच्या मार्गावर आहे. पुरुषांच्या T२० मध्ये सर्वात वेगवान १०० विकेट घेणारा गोलंदाज बनण्याची त्याला संधी आहे. सध्या हा विक्रम पाकिस्तानच्या हरिस रौफच्या नावावर आहे. त्याने ७१ टी-२० सामन्यांमध्ये ही कामगिरी केली. जून २०२४ मध्ये न्यू यॉर्कमध्ये कॅनडाविरुद्धच्या T२० विश्वचषक सामन्यात हरिस रौफने ही कामगिरी केली होती. अर्शदीपने ६२ सामन्यात ८.२७ च्या इकॉनॉमी रेटने ९८ विकेट घेतल्या आहेत. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने दोनदा चार विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे. अशा परिस्थितीत त्याला हे मोठे यश संपादन करण्याची संधी आहे.
T२० मध्ये सर्वात जलद १०० विकेट्स घेण्याचा विक्रम अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानच्या नावावर आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या ५३ व्या टी-२० सामन्यात त्याने हा टप्पा गाठला. यानंतर नेपाळचा संदीप लामिछाने आणि श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा यांचा या यादीत समावेश आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याने २ विकेट घेतल्यास तो T२० मध्ये १०० बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरेल.
From rising talent to match-winner, Arshdeep Singh excelled in 2024 to win the ICC Men’s T20I Cricketer of the Year award 🌟 pic.twitter.com/iIlckFRBxa
— ICC (@ICC) January 25, 2025
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती , रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
जोस बटलर (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंग्स्टन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट, मार्क वुड .