फोटो सौजन्य - ICC सोशल मीडिया
ICC महिला U19 T20 विश्वचषक 2025 सेमीफायनल : आयसीसी महिला U१९ T२० विश्वचषक २०२५ च्या उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या चार संघांची घोषणा करण्यात आली आहे. सुपर सिक्समध्ये १२ संघ होते. या १२ संघाचे विभाजन दोन गटांमध्ये करण्यात आले होते. सुपर सिक्सच्या पहिल्या गटामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेश, स्कॉटलंड आणि वेस्ट इंडिज हे संघ आहेत. तर दुसऱ्या गटामध्ये साऊथ आफ्रिका, इंग्लंड, नायझेरिया, यूएसए, न्यूझीलंड आणि आयर्लंड हे संघ आहेत.
पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि न्यूझीलंड या संघांना टॉप ४ मध्ये स्थान मिळालेले नाही. टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीचे तिकीट आधीच निश्चित केले होते, तर सोमवारी २७ जानेवारी रोजी इंग्लंड संघ टॉप ४ साठी पात्र ठरला. इंग्लंडने त्यांच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून उपांत्य फेरीचे तिकीट बुक केले. मात्र, कोणता संघ कोणाचा सामना करणार हे अद्याप ठरलेले नाही.
IND vs ENG : अर्शदीप सिंगला तिसऱ्या T20 सामन्यात इतिहास रचण्याची संधी, हारिस रौफचा मोडू शकतो रेकॉर्ड
महिलांच्या १९ वर्षाखालील T२० विश्वचषक स्पर्धेतील सुपर ६ सामने सध्या खेळले जात आहेत. आधीच चार संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत, कारण यात लीग टप्प्यातील सामन्यांचे निकाल महत्त्वाचे आहेत. इंग्लंड संघाने न्यूझीलंडचा ६ गडी राखून पराभव केला. इंग्लंडसमोर ३९ धावांचे लक्ष्य होते. त्याचवेळी न्यूझीलंडला उपांत्य फेरीसाठी आपले स्थान निश्चित करण्यासाठी ८९ धावांचा बचाव करावा लागला, जो त्यांना करता आला नाही. पावसामुळे सामनाही विस्कळीत झाला, त्यामुळे न्यूझीलंड संघाला पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना अतिशय रोमांचक होता.
India, Australia, and South Africa are through to the #U19WorldCup 2025 semifinals 🙌
Who do you think will join them 🤔
More 👉 https://t.co/WUwVpjpAXM pic.twitter.com/hvvTT34eE5
— ICC (@ICC) January 26, 2025
सुपर सिक्स टप्पा संपल्यानंतर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंड भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. सध्या सुपर सिक्ससाठी भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील प्रत्येकी एक सामना बाकी आहे. त्यानंतर उपांत्य फेरीत कोणते दोन संघ आमनेसामने येतील आणि दुसऱ्या उपांत्य फेरीत कोणते दोन संघ आमनेसामने येतील हे ठरविले जाईल. त्याचे चित्र आज स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने ३१ जानेवारीला वेगवेगळ्या वेळी खेळवले जाणार आहेत. २ फेब्रुवारीला अंतिम सामना होणार असून या विश्वचषकात कोणता संघ विजेता ठरणार हे कळेल.
भारताच्या युवा महिला संघानी आयसीसी महिला U१९ T२० विश्वचषक २०२५ च्या स्पर्धेमध्ये सातत्याने कमालीची केली आहे. यामध्ये भारताच्या संघाने एकही सामना न गमावता उपांत्य फेरी गाठली आहे. टीम इंडियाचे कर्णधारपद निकी प्रसादकडे आहे. तिच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे.