Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangalore stampede : ‘मी तुटलो, माझ्याकडे शब्द नाहीत..’,चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीवर Virat Kohli ची भावुक पोस्ट..  

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ मे रोजी आयपीएल विजेतेपद जिंकले. विजेतेपदाचा आनंद साजरा करतेवेळी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. यावर आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीने भावुक पोस्ट शेअर केली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 05, 2025 | 02:25 PM
Bangalore stampede: 'I am broken, I have no words..', Virat Kohli's emotional post on the stampede outside Chinnaswamy Stadium..

Bangalore stampede: 'I am broken, I have no words..', Virat Kohli's emotional post on the stampede outside Chinnaswamy Stadium..

Follow Us
Close
Follow Us:

Bangalore stampede : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ३ मे रोजी झालेल्या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाबचा ६ धावांनी पराभव करत पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले. बुधवारी या विजेतेपदाचा आनंद साजरा करण्यासाठी आरसीबी संघ बंगळुरूला रवाना झाला. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर आपल्या आवडत्या खेळाडूंना बघण्यासाठी  हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आणि ३३ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या अपघातानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. आता आरसीबीचा अनुभवी खेळाडू विराट कोहलीने देखील भावुक पोस्ट शेअर करून तो पूर्णपणे तुटल्याचे बोलला आहे.

विराट कोहलीने सोशल मीडियावर आरसीबीची अधिकृत पोस्ट शेअर करत लिहिले की या घटनेनंतर ‘मी पूर्णपणे तुटलो आहे आणि माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द  नाहीत.’ या घटनेवर विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील आरसीबीची पोस्ट शेअर करत  एक हृदयद्रावक इमोजी टाकला आहे.

हेही वाचा : RCB Victory Parade Stampede: बंगळुरूत चाहत्यांचा मृत्यू पाहून सचिन तेंडुलकरचे तुटले मन, हळहळ केली व्यक्त

आरसीबीची प्रतिक्रिया काय?

आरसीबीकडून  या घटनेवर दुःख व्यक्त करण्यात आले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, आज दुपारी आमचा संघ स्टेडियममध्ये पोहोचताच आम्हाला मीडिया रिपोर्ट्सद्वारे स्टेडियमबाहेर घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती मिळाली. हा आमच्यासाठी अत्यंत दुःखद आणि वेदनादायक क्षण आहे. या दुःखद घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल आरसीबी शोक व्यक्त करते आणि या अपघातामुळे दुःखी झालेल्या कुटुंबांबाबत संवेदना व्यक्त करते.

तसेच पुढे म्हटले की, आम्हाला हे स्पष्ट करायचे आहे की आम्हाला परिस्थितीची माहिती मिळताच, आम्ही आमच्या पूर्वनियोजित योजनांमध्ये आवश्यक बदल करून स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे आणि सूचनांचे पूर्णपणे पालन केले. आम्ही आमच्या सर्व चाहत्यांना आणि समर्थकांना त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सतर्क राहण्याचे आवाहन करतो.या असे आरसीबीने म्हटले आहे.

हेही वाचा : RCB Vs PBKS : बेंगलुरु संघाच्या विजयानंतर इचलकरंजीत हुल्लडबाजी; पाेलिसांकडून साैम्य लाठीमार

𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗦𝘁𝗮𝘁𝗲𝗺𝗲𝗻𝘁: 𝗥𝗼𝘆𝗮𝗹 𝗖𝗵𝗮𝗹𝗹𝗲𝗻𝗴𝗲𝗿𝘀 𝗕𝗲𝗻𝗴𝗮𝗹𝘂𝗿𝘂

We are deeply anguished by the unfortunate incidents that have come to light through media reports regarding public gatherings all over Bengaluru in anticipation of the team’s arrival this… pic.twitter.com/C0RsCUzKtQ

— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 4, 2025

मुख्यमंत्र्यांकडून मृतांना १० लाख देण्याची घोषणा

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अपघाताबद्दल प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, पुरेशी सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करणे ही सरकारची जबाबदारी आहे. तसेच ते म्हणाले की,  क्रिकेट असोसिएशनने परिस्थिती हाताळायला हवी होती. स्टेडियममध्ये फक्त एक छोटासा गेट उघडा होता, जिथे मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती.  गर्दी वाढताच लोकांनी जबरदस्तीने दरवाजा तोडला, ज्यामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. मुख्यमंत्र्यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदतीची घोषणा केली.

Web Title: Virat kohlis emotional post on the stampede outside chinnaswamy stadium

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • IPL 2025
  • RCB Vs PBKS
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
1

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
2

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
3

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral
4

हातात छत्री आणि पाण्याची बाटली…लंडनच्या रस्त्यांवर अनुष्कासोबत दिसला कोहली! Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.