Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशियाई खेळात भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यामध्ये भारताच्या संघाने बांग्लादेशला ९६ धावांवर गुंडाळलं

९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा यशस्वी जैस्वालने खाते न उघडता बाद झाला.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 06, 2023 | 01:04 PM
आशियाई खेळात भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यामध्ये भारताच्या संघाने बांग्लादेशला ९६ धावांवर गुंडाळलं
Follow Us
Close
Follow Us:

आशियाई खेळ २०२३ : हांगझो आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये पुरुष क्रिकेटच्या पहिल्या उपांत्य फेरीमध्ये भारताच्या संघाने बांग्लादेशचा ९ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर भारताच्या संघाने फायनलमध्ये धडक मारली असून भारताच्या संघाला किमान रौप्य पदक निश्चित आहे. फायनलमध्ये भारताचा सामान अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. या सामन्यामध्ये बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करत नऊ गड्यांच्या मोबदल्यात ९६ धावा केल्या होत्या. भारताच्या संघाने १ विकेट गमावून ९७ धावा केल्या आणि सामना जिंकला.

भारताने आशियाई क्रीडा २०२३ च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बांग्लादेशचा नऊ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यामुळे टीम इंडियाचे किमान रौप्य पदक निश्चित आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सामन्यातील विजेत्याशी होणार आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रुतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली आणि पहिली विकेट १८ धावांवर पडली. यानंतर बांग्लादेश संघ नियमित अंतराने विकेट्स गमावत राहिला आणि ९६ धावांवर बाद झाला.

बांग्लादेशकडून झाकीर अलीने सर्वाधिक नाबाद २४ धावा केल्या. परवेझ हुसेनने २३ धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय फक्त रकीबुल हसन (१४ धावा) दुहेरी आकडा पार करू शकला. बांग्लादेशचे सात फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. दोन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. सात आणि एका धावेदरम्यान पाच फलंदाज बाद झाले. भारताकडून रवी साई किशोरने तीन बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने दोन गडी बाद केले.

९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा यशस्वी जैस्वालने खाते न उघडता बाद झाला. मात्र, त्यानंतर टिळक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी स्फोटक पद्धतीने धावा केल्या. चौथ्या षटकातच भारताची धावसंख्या ५० धावांपर्यंत पोहोचली. टिळकने नवव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले आणि टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर होती. भारताने ९.२ षटकात एक विकेट गमावून ९७ धावा केल्या आणि सामना जिंकला. टिळक वर्मा २६ चेंडूत ५५ धावा आणि ऋतुराज गायकवाड २६ चेंडूत ४० धावा करून नाबाद राहिला. बांगलादेशकडून रिपन मोंडलने एकमेव विकेट घेतली.

Web Title: Washington sundar asian games 2023 hangzhou china afghanistan pakistan india vs bangladesh indian captain ruturaj gaikwad yashasvi jaiswal tilak verma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2023 | 01:04 PM

Topics:  

  • Afghanistan
  • Asian Games 2023
  • China
  • india vs Bangladesh
  • pakistan

संबंधित बातम्या

पुतिन-जिनपिंग यांना दुर्घायुषी होण्याची आशा; 150 वर्षे जगण्याची करत आहेत आकांशा
1

पुतिन-जिनपिंग यांना दुर्घायुषी होण्याची आशा; 150 वर्षे जगण्याची करत आहेत आकांशा

China backs India : ट्रम्पच्या टॅरिफ मनमानी कारभारावर भारताला चीनचा ठाम पाठिंबा; राजदूत म्हणाले, ‘भारताने कोणत्याही टॅरिफ…’
2

China backs India : ट्रम्पच्या टॅरिफ मनमानी कारभारावर भारताला चीनचा ठाम पाठिंबा; राजदूत म्हणाले, ‘भारताने कोणत्याही टॅरिफ…’

ओप्पो, विवो नाही ही कंपनी आहे पाकिस्तान स्मार्टफोन युजर्सची पहिली पसंती, नाव तर तुम्हीही ऐकल नसेल
3

ओप्पो, विवो नाही ही कंपनी आहे पाकिस्तान स्मार्टफोन युजर्सची पहिली पसंती, नाव तर तुम्हीही ऐकल नसेल

Pakistan Data Leak : 500 रुपयांना लोकेशन, 2000 रुपयांना मोबाईल रेकॉर्ड! पाकिस्तानात भीषण डेटा लीक; मंत्र्यांपर्यंत माहिती विक्रीला
4

Pakistan Data Leak : 500 रुपयांना लोकेशन, 2000 रुपयांना मोबाईल रेकॉर्ड! पाकिस्तानात भीषण डेटा लीक; मंत्र्यांपर्यंत माहिती विक्रीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.