Asia Cup 2025: 'We are inferior in every way...', Pakistan captain's big revelation after being beaten by India
IND VS PAK : आशिया कप सुपर ४ फेरीच्या सामन्यात भारताकडून पाकिस्तानला ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारतीय संघ गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर चांगला खेळला. परिणामी आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध सलग दोन विजय मिळवले आहेत. या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला को, आम्ही प्रत्येक बाबतीत भारतीय संघापेक्षा खूप कमी पडलो.
पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आघाकडून हे कबूल करण्यात आले की, भारताविरुद्धच्या आशिया कप सुपर ४ सामन्यात पाकिस्तानी त्यांचा संघ प्रत्येक विभागात बाद ठरला. पहिल्या दहा षटकांनंतर मैदानावर फलंदाजी करणे खूप कठीण झाले होते. पहिल्या दहा षटकांमध्ये ९१ धावा काढल्यानंतर, पाकिस्तान पुढील दहा षटकांमध्ये फक्त ८० धावाच जोडू शकला. भारताकडून शिवम दुबेने शानदार गोलंदाजी करत पाकिस्तानी संघाच्या फलंदाजावर अंकुश ठेवला. त्याने ३ ओव्हरमध्ये १६ धावा देत दोन विकेट्स मिळवल्या.
हेही वाचा : Asia cup 2025 : Abhishek Sharma पाकिस्तानवर कडाडला! आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर टोलवला ऐतिहासिक षटकार
पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा म्हणाला की, “आम्ही फलंदाजीत चांगली कामगिरी केली, जी खूप चांगली गोष्ट आहे. पण, आम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली होती, त्यानंतर आम्हाला आणखी १५ धावा काढायला हव्या होत्या. पण पहिल्या दहा षटकांनंतर चेंडू मऊ झाला, ज्यामुळे फलंदाजी करणे अधिक कठीण झाले.” पाकिस्तानने २० षटकांत १७१ धावा केल्या होत्या.
सलमान अली आगा पुढे म्हणाला, “आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी करू शकलो नाही आणि त्यामुळे आम्हाला मोठी किंमत मोजावी लागली. तुम्हाला एक परिपूर्ण सामना खेळावा लागेल आणि जिंकण्यासाठी तिन्ही विभागांमध्ये चांगली कामगिरी करणे आवश्यक आहे. आम्ही चांगली क्षेत्ररक्षण किंवा गोलंदाजी करण्यात अपयशी ठरलो.” परिणामी भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना १८.५ षटकांत जिंकला.
भारताविरुद्धल पाकिस्तानला पराभव स्वीकारल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार सलमान अलीकडून त्याच्या संघाला पुढील सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करण्यात आले. पाकिस्तान मंगळवारी श्रीलंकेसोबत दोन हात करणार आहे. तो पुढे म्हणाला की, “आम्हाला हा सामना विसरून जावे लागणार आहे. कारण, आमचा मंगळवारी आणखी एक सामना आहे. आम्हाला या सामन्यात चांगले प्रदर्शन करावे लागणार आहे.”