भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : Asia cup 2025 : IND vs PAK सामन्याने लिहिला नवा इतिहास! दुबईच्या मैदानावर विक्रमांचा पाऊस; एकदा वाचाच
पाकिस्तानकडून भारतासमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानने दिलेल्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारतीय संघासाठी डावाची सुरुवात केली. यामध्ये अभिषेक शर्माकडे स्ट्राईक होता. दरम्यान, शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तानसाठी पहिले षटकार टाकण्यासाठी आला. या दरम्यान, त्याने शाहीनच्या पहिल्याच चेंडूवर एक शानदार षटकार खेचला.
भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारून टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एखाद्या फलंदाजाने शाहीन शाह आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आहे. अभिषेक शर्माने आधीच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दोन वेळा षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.
पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीबद्दल सांगायचे झाल्यास, तर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण ७० वेळा पहिले षटक टाकले आहे. परंतु, आतापर्यंत त्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कोणालाही षटकार मारता आला नाही. परंतु अभिषेक शर्मा हा पराक्रम करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
भारतीय संघाने या सामन्यात पाकिस्तानचा ६ विकेट्सने दणदणीत पराभव केला. पाकिस्तान संघासाठी हा मानहानिकरक पराभव ठरला. तथापि, पाकिस्तानने चांगली फलंदाजी करत भारतासमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाकडून अभिषेकने सर्वाधिक ७४ धावांची स्फोटक खेळी केली. त्याने या खेळीत ६ चौकार आणि ५ षटकारांची बरसात केली.
हेही वाचा : Asia cup 2025 : ‘शाहीन आफ्रिदीचा फॉर्म खराब, त्याने आता ब्रेक घ्यावा..’, पाकिस्तानी माजी खेळाडूचा सल्ला
तर जोडीदार शुभमन गिलने २८ चेंडूमध्ये ४७ धावा केल्या. यामध्ये त्याने ८ चौकार लगावले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी एकूण १०५ धावांची मोठी भागीदारी केली. तिलक वर्माने देखील १९ चेंडूत २ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने नाबाद ३० धावा काढल्या.






