फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध श्रीलंका : सध्या भारताचा श्रीलंका दौरा सुरु आहे, यामध्ये भारताच्या संघाने T२० मालिका खेळली, या मालिकेमध्ये भारताच्या संघाने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मालिका ३-० अशी जिंकली. आजपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये तीन सामान्यांची एकदिवसीय सुरु होणार आहे. या मालिकेची कमान भारताचा कर्णधार रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. या संघामध्ये अनेक बदल करण्यात आले आहे. त्याचबरोबर राहुल द्रविडच्या निवृत्तीनंतर आता भारतीय संघामध्ये मोठे बदल देखील करण्यात आले आहे. आजच्या सामन्यांमध्ये अनेक जुन्या खेळाडूंची टीम इंडियामध्ये पुनरागमन होणार आहे. यामध्ये केएल राहुल, श्रेयस अय्यर या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
भारताच्या या श्रीलंकेविरुद्ध मालिकेमध्ये नव्या खेळाडूंना सुद्धा संधी देण्यात आली आहे. या यादीमध्ये हर्षित राणाचा समावेश आहे. त्याचबरोबर धक्कादायक म्हणजेच रियान परागला T२० सामन्यामध्ये आणि एकदिवसीय सामन्यामध्ये सुद्धा संधी मिळाली आहे. या निर्णयामुळे अनेक चाहते निराश आहेत. विश्वचषकानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली हे दोघे पहिल्यांदाच हा आजचा सामना खेळणार आहेत. यामालिकेमध्ये तीन सामने रंगणार आहेत. आज पहिला सामना खेळवला जाणार आहे. दुसरा सामना ४ ऑगस्ट रोजी आयोजित केला जाणार आहे तर तिसरा आणि शेवटचा सामना ७ ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे.
पहिला सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. कारण आजच्या सामन्यामध्ये जो संघ विजय मिळवेल त्याच्याकडे १-० अशी आघाडी असणार आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका सामना आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता सुरु होणार आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका सामान्यचे ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लाईव्ह अपवर पाहता येणार आहे. तर टेलिव्हिजनवर पाहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांसाठी हा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रक्षेपण दाखवले जाणार आहे.