
फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
India vs New Zealand Live Streaming, 2nd ODI : भारतीय क्रिकेट संघ दुसरा एकदिवसीय सामना जिंकून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी उत्सुक असेल. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ( IND vs NZ 2nd ODI) बुधवार, १४ जानेवारी रोजी राजकोट येथे खेळला जाईल. टीम इंडियाने पहिला एकदिवसीय सामना ४ विकेट्सने जिंकला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता त्यांचे लक्ष दुसरा एकदिवसीय सामना जिंकण्यावर असेल, तर न्यूझीलंड संघ हा सामना जिंकून पुनरागमन करू इच्छित असेल. हा सामना भारताच्या संघाचा 14 जानेवारी रोजी होणार आहे.
पहिल्या एकदिवसीय सामन्याप्रमाणेच या सामन्यातही सर्वांच्या नजरा रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर असतील. पहिल्या सामन्यामध्ये विराट कोहलीचे शतक हे 7 धावांनी हुकले त्यामुळे आता तो दुसऱ्या सामन्यामध्ये कशी कामगिरी करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. चला तर मग जाणून घेऊया की चाहते भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा एकदिवसीय सामना टीव्ही आणि मोबाईलवर कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहू शकतात?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये होणार दुसरा एकदिवसीय सामना हा 14 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. न्यूझीलंडचा संघ मालिका वाचवण्याचा प्रयत्न करेल तर भारताचा संघ दुसरा विजय नोदवून मालिकेमध्ये विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. या सामन्याचे आयोजन हे राजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर केले जाणार आहे.
What’s on the experts’ radar for the 2nd ODI?👀 What’s the one thing you’re looking forward to in the next game? ✍️👇#INDvNZ, 2nd ODI 👉 WED, 14th JAN, 12:30 PM pic.twitter.com/cR2ejkMlTP — Star Sports (@StarSportsIndia) January 13, 2026
भारत आणि न्यूझीलंड या सामन्यांची सुरूवात 1.30 मिनीटांनी होणार आहे. तर या सामन्यांच्या अर्ध्या तासाआधी नाणेफेक होईल म्हणजेच 1 वाजता नाणेफेक होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर पाहू शकतात. चाहते जिओ हॉटस्टार अॅपवर भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.
भारत- शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसीद्ध कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ध्रुवी जुरेल, मोहम्मद सिराज.
न्यूझीलंड – मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), मिचेल हे (यष्टीरक्षक), निक केली, हेन्री निकोल्स, विल यंग, जोश क्लार्कसन, ग्लेन फिलिप्स, आदित्य अशोक, ख्रिश्चन क्लार्क, जॅक फॉक्स, डॅरिल मिचेल, काइल जेमिसन, डेव्हॉन कॉनवे (यष्टीरक्षक), जेडेन लेनोक्स, मायकेल रे.